एक्स्प्लोर

Abhinay Berde : ‘चॉकलेट बॉय’ अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बाप्पा माझा एक नंबर’ गाणं रिलीज

Abhinay Berde Upcoming Movie : ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे.

Abhinay Berde Upcoming Movie : श्री गणेशाचं अर्थात आराध्यदैवत असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सध्या सगळ्यांनाच गणरायाच्या (Ganesh Chaturthi 2022) आगमनाचे वेध लागले आहेत. यामध्ये 'चॉकलेट बॉय' अभिनेता अभिनय बेर्डेसुद्धा (Abhinay Berde) अपवाद नाही. मी देखील बाप्पाचा ‘नंबर वन फॅन’ असल्याचं सांगत बाप्पाच्या स्वागताच्या जल्लोषात तो सहभागी झाला आहे. ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. नितीन केणी यांच्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अभिनय बेर्डे, हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि ‘बिग बॉस 15’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही फ्रेश जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

बाप्पा माझा एक नंबर... फॅन मी त्याचा एक नंबर... !

ताल धरायला लावणाऱ्या या गाण्यावर अभिनयचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला थिरकायला लावेल अशा या गाण्याचे बोल आणि त्याचे संगीत या दोन्ही बाजू शोर यांनी सांभाळल्या आहेत. देव नेगी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. राहुल आणि संजीव यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सुदेश सावंत हे या गाण्याचे साऊंड प्रोड्युसर आहेत. संगीताचे हक्क टिप्स कंपनीकडे आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Tips Marathi (@tips.marathi)

या गाण्याबद्दल बोलताना अभिनय सांगतो की, ‘बाप्पाचं आगमन’ सगळयांनाच आनंद देणार असतं. हाच आनंद आणि उत्साह तुम्हाला या गाण्यात पहायला मिळेल. मला स्वत:ला गणपतीचं हे गाणं करताना खूप मजा आली. ‘बाप्पा’ हा सर्वांसाठीच नंबर वन’ असतो. यंदाच्या गणपतीत हे गाणं कल्ला करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.'

या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट आर्टस प्रोड्क्शन, वेंकट अत्तीली आणि मृत्युंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. निशिता केणी आणि करण कोंडे यांच्या ड्रगन वॉटर फिल्म्सने या चित्रपटाची सहनिर्मीती केली आहे. तर ‘यूएफओ सिने मिडिया नेटवर्क’ या चित्रपटाचे वितरक पार्टनर आहेत. व्यवसाय प्रमुख शौमिल शहा आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget