एक्स्प्लोर

Sundar Me Honar Marathi Play: अभिजीतला 'अमोल' साथ, 'सुंदर मी होणार' नाटकात दोन दिग्गज अभिनेते महत्त्वाच्या भूमिकेत

Sundar Me Honar Marathi Play: पुलंचे 'सुंदर मी होणार' हे नाटक तब्बल तीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत.

Sundar Me Honar Marathi Play: चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच  वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात पाहायला मिळणार आहे. महाराजांचा जावई म्हणजेच सुरेश या गायकाच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते अमोल बावडेकर दिसणार आहेत. अभिनय आणि गायन असे दोन्ही प्रांत गाजविणारे अमोल बावडेकर सुरेश या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या आवाजातील आणि मनातील सुंदरतेचा शोध घेण्याचा प्रवास उलगडून दाखविणार आहेत. 

पुलंचे 'सुंदर मी होणार' हे नाटक तब्बल तीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत. करण देसाई आणि आकाश भडसावळे निर्मित हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 12 जूनला देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहे.

आपल्या या  भूमिकेविषयी बोलताना अभिजीत सांगतात,  ‘कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते’. 'सुंदर मी होणार' नाटकात काम करायला मिळाल्याचा आनंद आहे, त्यातही महाराज (संस्थानिक) यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. अभिनेता म्हणून ही भूमिका समाधान देणारी असल्याचेही अभिजीत यांना वाटते. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचे अमूल्य मार्गदर्शन इतर सहकलाकारांची उत्तम साथ या सगळ्यांमुळे मला वेगळ्या स्तरावर नेणारी भूमिका साकारणं शक्य झाल्याचं अमोल बावडेकर आवर्जून सांगतात.

या दोघांसोबत आस्ताद काळे, स्वानंदी टिकेकर, श्रुजा प्रभुदेसाई, सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर यांच्या भूमिका आहेत. निर्माते करण देसाई आणि आकाश भडसावळे सांगतात, ‘‘एक अभिजात कलाकृती पुन्हा रसिकांसमोर सादर करणे आमच्यासाठी एक जबाबदारीच आहे. अभिजात कलाकृती पुन्हा पहायला मिळणे हे अगोदरच्या पिढीतील प्रेक्षकांसाठी स्मरणरंजन असेल तर नव्या पिढीला जुन्या कलाकृतींचे सामर्थ्य यामुळे अनुभवता येईल’’

‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा विषय हा भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा आहे. भारतातील राजघराणी, संस्थाने पूर्णपणे खालसा  झाल्यानंतरच्या बदलाचा सर्वांना जबरदस्त फटका बसला होता. काहींनी काळाप्रमाणे स्वतःला बदलून घेतले, तर काहींनी सत्ता नसताना सुद्धा त्याच तोऱ्यात, अवेशात राहणे कवटाळले होते. या नाटकातल्या महाराजांनादेखील हा सत्ताबदल मान्य नाही. त्यांच्या नाहक तोऱ्याचा, खोट्या अवसानाचा त्यांच्या चार मुलांवर परिणाम झालेला आहे. त्यांच्या स्वतःचे असे अस्तित्वच त्यामुळे दाबले गेले आहे. आजूबाजूच्या अशा अनेकांच्या पायात, कधी दृश्य तर कधी अदृश्य मानसिक पारतंत्र्याच्या बेड्या पडलेल्या आपण पाहतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी भान यावं लागतं. हे भान आल्यावर प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करतो आणि यात प्रत्येक पात्राला आपापला जगण्याच्या सुंदरतेचा मार्ग सापडतो. हे पु.ल. देशपांडे यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून आपल्या लेखन समर्थ्याने अधोरेखित केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget