एक्स्प्लोर

I Prem You : चित्रपटातून भरणार प्रेमाचे रंग, 'आय प्रेम यु'मध्ये झळकणार अभिजीत आमकर-कयादू लोहारची जोडी!

चित्रपटाचे नाव ऐकताच चित्रपटाच्या कथेचे स्वरूप कळलेच असेल, मात्र नेमकं वेगळेपण असे या चित्रपटात काय आहे हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट प्रिय व्यक्तीसोबत पाहणे रंजक ठरणार आहे.

Marathi Movie : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं! या वाक्याने तर आजवर अनेक प्रेमांना एकत्रित बांधले आहे. पावसाच्या चाहूलीला मोराचा थुयथुयाट जसा पाहायला मिळतो, तसा ‘व्हॅलेंटाईन डे’ आला की आपल्यात दडलेला प्रेमी आणि दडलेल्या प्रेमभावना फेर धरून नाचू लागतात. असा हा प्रेममय दिन येताच मनात फुलपाखरं बागडू लागतात आणि या रोमँटिक दिवसाची खास सुरुवात करावीशी वाटते. मात्र, यंदाचा हा रोमँटिक क्षण तुमच्या भेटीस 'साईश्री एंटरटेनमेंट' यांच्या 'आय प्रेम यु' (I Prem You) या चित्रपटासोबत घालवता येणार आहे.

चित्रपटाचे नाव ऐकताच चित्रपटाच्या कथेचे स्वरूप कळलेच असेल, मात्र नेमकं वेगळेपण असे या चित्रपटात काय आहे हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट प्रिय व्यक्तीसोबत पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र, हा चित्रपट पाहण्यास थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. कारण 'व्हॅलेंटाईन डे' चे औचित्य साधत चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, प्रेक्षकांची रंगत वाढवणार आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे यात अभिनेता अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत अभिनेत्री कयादू लोहार मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिजीत आणि कयादूची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

एका प्रेमाची कहाणी!

'आय प्रेम यु' चित्रपटाची प्रेमकहाणी ही फक्त प्रेमकहाणी नसून प्रेमाची कहाणी आहे. मैत्री आणि अलगद तयार झालेल्या नात्यांची ही गुंतागुंत या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अभिजीत मुख्य भूमिकेत असून, याआधी अभिजीतचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 'टकाटक', 'एक सांगायचय' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेता अभिजीत आमकरने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे आणि म्युझिक अल्बममधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला.

आता लवकरच अभिजीत एका नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. रोमँटिक कलाकारांच्या यादीत अभिजीत कुठेही कमी नाही, त्यामुळे अभिजीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उतरवण्यास नक्कीच तयार असेल यांत शंकाच नाही. अभिजीत आणि कयादूची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यांच्या अभिनयाच्या आणि कथेच्या जोरावर हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या प्रेमात रंगत आणेल यांत शंकाच नाही.

या चित्रपटात अभिजीत ‘सखा’ ही भूमिका साकारत असून, संगीताची आवड असलेला सखा स्वतःच्या प्रेमात कसे संगीताचे सूर भरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर, कयादू या चित्रपटात ‘वीणा’ हे पात्र साकारत असून, स्वप्न उराशी बाळगून आलेल्या संकटाना सामोरी जाण्याची जिद्द असणारी अशी ही वीणा आपल्या प्रेमाला कशी सामोरी जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Embed widget