एक्स्प्लोर

Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ

Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: बॉलिवूड स्टार आमिर खान वयाच्या 61 व्या वर्षी, 5 जुलै रोजी आपली प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसऱ्यांदा लग्न करण्यास सज्ज झालाय. हा विवाह अत्यंत खाजगी स्वरूपाचा असेल आणि त्यात केवळ कुटुंबीय, जवळचे मित्रच उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Mr. Perfectionist) आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. वयाच्या 61 व्या वर्षी, आमिर 5 जुलै 2026 ला त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्याशी आपली लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, यावेळी कोणताही बडेजाव किंवा भव्य सोहळा न करता, केवळ कुटुंबाच्या उपस्थितीत मुंबईत (Mumbai News) हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गौर स्प्रॅट यांचा विवाहसोहळा अत्यंत खाजगी स्वरूपाचा असेल आणि त्यात केवळ कुटुंबीय, जवळचे मित्रच सहभागी होतील. लग्नानंतर बॉलिवूडमधील मोठा सोहळा किंवा भव्य रिसेप्शन आयोजित करण्याची सध्या तरी कोणतीही योजना नाही.

आमिर आणि गौरी 'स्पेशल मॅरेज ॲक्ट' अंतर्गत त्यांच्या लग्नाची नोंदणी करतील. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आमिरच्या घरीच कुटुंबासोबत एक छोटासा आणि खासगी स्वरूपाचा सोहळा साजरा केला जाईल. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील कोणत्याही व्यक्तीला निमंत्रित केलेलं नाही, तर अगदी त्याचे जवळचे मित्र सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानही (Shah Rukh Khan) यावेळी त्याच्यासोबत दिसणार नाहीत.


Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ

गौरी स्प्रॅटसोबत दीर्घकाळापासूनचं नातं

गेल्या काही महिन्यांत आमिर खानची मैत्रीण गौरी स्प्रॅट ही चर्चेत आली. आमिरनं स्वतः त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदाच त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे सांगितलंय.

गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची आहे, तिची आई भारतीय आहे, तर वडील आयरिश आहेत. गौरी दीर्घकाळापासून कॉर्पोरेट आणि व्यावसायिक क्षेत्राशी जोडलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिनं फॅशन, सौंदर्य आणि लाइफस्टाईल संबंधित व्यवसायांमध्येही काम केलंय. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांची ओळख नवी नाही, ते एकमेकांना सुमारे 25 वर्षांपासून ओळखतात. मात्र, त्यांच्यातील प्रेमाची सुरुवात काही वर्षांपूर्वीच झाली आणि त्यांचं नातं हळूहळू अधिक दृढ होत गेलं. 


Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ

मीडिया रिपोर्टनुसार, गौरीचं यापूर्वी लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगा आहे. दरम्यान, दोन लग्नांनंतर आमिर खान आता आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली असून, गौरीचं आमिर खानच्या मुलांशीही चांगले संबंध असल्याचं समजतंय. आपल्या 60 व्या वाढदिवसानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना गौरीची जगाशी ओळख करून देताना आमिर खान म्हणाला की, त्याला अशी जोडीदार मिळाली आहे, जिच्यासोबत त्याला अत्यंत कम्फर्टेबल आणि आनंदी वाटतं. तेव्हापासून ही जोडी अनेकदा एकत्र दिसली आणि त्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चा सतत रंगत आहेत.

आमिर खानचं गौरीसोबतचं तिसरं लग्न

आमिर खाननं पहिलं लग्न रीना दत्ता यांच्यासोबत केलेलं. दोघांना दोन मुलं आहेत, जुनैद खान आणि आयरा खान. जवळपास 16 वर्षांपासून एकत्र राहिल्यानंतर 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आमिर खाननं 2005 मध्ये फिल्ममेकर किरण राव यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोघांना एक मुलगा आजाद राव खान आहे. दरम्यान, लग्नानंतर तब्बल 15 वर्षांनी 2021 मध्ये आमिर आणि किरण यांनी आपसी सहमतीनं घटस्फोट घेतला. त्यानंतर आजही दोघांमधील मैत्री कायम आहे आणि मुलाचं संगोपन दोघेही एकत्र करत आहेत. दोन लग्न मोडल्यानंतर आता आमिर खान आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. गौरीवर आणि आमिर खानवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mamta Kulkarni On Aamir khan: मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला, विवाहित आमिर खान? नकार मिळाल्यानं थेट आयुष्य संपवायला निघालेला? स्वतः अभिनेत्रीनं सगळं सांगितलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget