एक्स्प्लोर

'होय, मी 5 जुलैला लग्न करतोय...'; मीडियासमोर लाजताना दिसला 60 वर्षांचा नवरदेव आमिर खान, मागे उभ्या असलेल्या लेकाला हसूच आवरेना

Aamir Khan Gauri Spratt Wedding: आमिर खानची यापूर्वी दोन लग्न झालीत आणि दोन्ही पत्नींसोबत घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर आता आमिर खान त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Aamir Khan Gauri Spratt Wedding: बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Mr. Perfectionist) आमिर खान (Aamir Khan) यानं शेवटी आपल्या तिसऱ्या लग्नाबाबत (Aamir Khan Third Marriage) स्वतः माध्यमांसमोर येऊन घोषणा केलीय. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आमिर खान आता त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत (Gauri Spratt) तिसरं लग्न करणार आहे. 5 जुलैला आमिर खान (Actor Aamir Khan) त्याच्या आयुष्यात तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहोल्यावर चढणार आहे. यापूर्वी आमिर खानची दोन लग्न झालीत आणि दोन्ही पत्नींसोबत घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर आता आमिर खान त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत (Aamir Khan Gauri Spratt) लग्नगाठ बांधणार आहे. 

नुकताच आमीर खान त्याचा पहिल्या पत्नीपासूनचा मोठा मुलगा जुनैद खानसोबत (Junaid Khan) दिसलेला. तिथं त्यानं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमिर खानला त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आमिर खाननं 'हां... माझं लग्नंय 5 जुलैला आहे...', असं सांगितलं. तसेच, एका छोटेखानी घरगुती समांरभात आम्ही लग्न करणार आहोत, असंही सांगितलं. जेव्हा काहीसं लाजत आणि आनंदानं त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत चर्चा केली, तेव्हा त्याचा मोठा मुलगा जुनैद खान त्याच्यासोबत उपस्थित होता. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकताना जुनैदला हसू आवरत नव्हतं. 

छोटेखानी घरगुती समारंभात आमिर खान बांधणार लग्नगाठ (Aamir Khan Third Marriage With Gauri Spratt)

'प्रेम पेड्रो'च्या प्रीमियरला आपला मुलगा जुनैदसोबत आलेल्या आमिरनं उपस्थित माध्यमांशी मनमोकळेपणानं संवाद साधला आणि हसतमुखानं आपल्या लग्नाबद्दल माहिती दिली. काहीसा लाजतच  आमिर खान म्हणाला, "हो, मी 5 जुलैला लग्न करतोय. हा एक छोटेखानी समारंभ असेल. आम्ही घरीच, फक्त कुटुंब आणि काही जवळच्या मित्रमंडळींसोबत लग्नगाठ बांधणार आहोत. अगदी साध्या पद्धतीनं आम्ही घरीच लग्न करणार आहोत..." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आमिर खाननं आपल्या नव्या आयुष्यासाठी चाहत्यांचं प्रेम आणि आशीर्वादही मागितलेत. तो म्हणाला, "मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. कृपया प्रार्थना करा की, आपण दोघे आनंदी राहू आणि आपलं आयुष्य आनंदात जाईल..." आमिर खाननं हे स्पष्ट केलंय की, हे भव्यदिव्य असं बॉलिवूड लग्न असणार नाही. लग्नाला फक्त कुटुंब आणि बालपणीचे जुने मित्र उपस्थित राहतील... हा पूर्णपणे एक कौटुंबिक सोहळा असेल..."

दोन घटस्फोटांनंतर आमिर खानची गौरीसोबत आयुष्याची नवी सुरुवात

आमिर खानचं गौरीसोबतचं लग्न हे त्याचं तिसरं लग्न असेल. त्याचं पहिलं लग्न रीना दत्ता यांच्याशी झालेलं आणि त्यांना जुनैद खान, इरा खान ही दोन मुलं आहेत. 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, 2005 मध्ये आमिरनं किरण राव यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना आझाद राव खान नावाचा मुलगा आहे. पण, 2021 मध्ये त्यांनी परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ते आजही चांगले मित्र आहेत आणि आपल्या मुलाची एकत्रितपणे काळजी घेतात.

आधीची दोन लग्नं मोडल्यानंतर, वयाच्या 61 व्या वर्षी आमिर खान आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. 5 जुलै रोजी तो गौरी स्प्रॅट हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. या नव्या प्रवासासाठी चाहते त्याला शुभेच्छा आणि खूप प्रेम देत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

South OTT Release This Week: या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget