Aadesh Bandekar Son Soham Wedding Rumors: आदेश भावोजींच्या घरी दुमदुमणार सनई-चौघड्यांचे सूर; 'ही' अभिनेत्री होणार बांदेकरांची 'सूनबाई'
Aadesh Bandekar Son Soham Wedding Rumors: महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजे, आदेश बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Aadesh Bandekar Son Soham And Pooja Birari Wedding Rumors: 'दार उघड बये, दार उघड...', अवघ्या महाराष्ट्रातील वहिनींना अशी साद घालणाऱ्या भावोजींच्या घरी लवकरच सनई-चौघड्यांचे सूर वाजणार आहेत. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आता लवकरच सासरे म्हणून मिरवणार आहेत. बांदेकरांचा लेक लवकरच आपली लग्नगाठ बांधणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री बांदेकरांची सूनबाई होणार आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर (Marathi Actor) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं. आई-वडिलांप्रमाणेच आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकरनंही (Soham Bandekar ) मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'नवे लक्ष्य' या मालिकेतून त्यानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असणारं बांदेकर कुटुंबीय सध्या प्रोफेशनल लाईफमुळे नाहीतर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बांदेकरांचा लेक सोहम लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राजश्री मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री पूजा बिरारीसोबत सोहम आपली साताजन्माची गाठ बांधणार असून लवकरच लग्नाचा बार उडणार आहे.
राजश्री मराठीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टनुसार, सोहम बांदेकर 'येड लागलं प्रेमाचं' फेम पूजा बिरारीसोबत लग्न करणार आहे. सोहम आणि पूजा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, यावर अद्याप आदेश बांदेकर किंवा सुचित्रा बांदेकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर सोहम किंवा पूजानं त्यांच्या लग्नाबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
बांदेकरांची होणारी सूनबाई कोण?
मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच बांदेकर कुटुंबाची सूनबाई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी पूजा बिरारी 29 वर्षांची आहे. तिनं 'साजणा' मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती 2021 मध्ये स्टार प्रवाहवर आलेल्या 'स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा' मालिकेतून घराघरांत पोहोचली. सध्या ती 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेमध्ये दिसतेय. या मालिकेत ती बिग बॉस मराठीचा विनर विशाल निकमसोबत स्क्रिन शेअर करतेय. पूजा बिरारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : नवनीत राणांनी राज ठाकरेंवर टीका करताच सिद्धार्थ जाधवने पाठ फिरवली? सत्य काय?























