VIDEO : नवनीत राणांनी राज ठाकरेंवर टीका करताच सिद्धार्थ जाधवने पाठ फिरवली? सत्य काय?
Siddharth Jadhav Navneet Rana and Raj Thackeray : नवनीत राणांनी राज ठाकरेंवर टीका करताच सिद्धार्थ जाधवने पाठ फिरवली? नेमकं काय घडलं?

Siddharth Jadhav Navneet Rana and Raj Thackeray : संपूर्ण देशभरात रविवारी (दि.18) दहिहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत मोठे दहिहंडी उत्सव पार पडले. अनेक दहिहंडी उत्सवांचं नियोजन राजकारणी मंडळींनी केलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे प्रत्येक दहिहंडी उत्सवात मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. मुंबईतील दहिहंडी मोहत्सवात बॉलिवूड कलाकारांसह नृत्यांगणा गौतमी पाटील हिने स्टेज गाजवले. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवनीत राणा राज ठाकरेंवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात..
महाराष्ट्रातील अनेक राजकारणी मंडळींनी दहिहंडीचं आयोजन केलेलं पाहायला मिळालं. यामध्ये भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा देखील मागे राहिले आहेत. नवनीत राणा यांनी दहिहंडी साजरी करण्यासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याला बोलावलं होतं. यावेळी सिद्धार्थ जाधवने देखील हजेरी लावली. मात्र, यावेळी नवनीत राणा यांनी त्यांच्या भाषणातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. दरम्यान, नवनीत राणा राज ठाकरेंवर सकडून टीका करत असताना सिद्धार्थ जाधव तेथून निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. मात्र, सिद्धार्थ जाधव तेथून निघून गेला नाही. तो गिफ्ट स्वीकारण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो नवनीत राणा यांच्याकडे परत आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सोशल मीडियावर सिद्धार्थ जाधव निघून गेल्याचा व्हिडीओ कट करुन व्हायरल करण्यात आलाय. याबाबत सिद्धार्थ जाधव याने अधिकृत भूमिका मांडलेली नाही.
नवनीत राणा म्हणाल्या, सगळे जण सिद्धार्थ जाधवचा सिनेमा पाहाणार का नाही? आपल्या महाराष्ट्राचे कलाकार आहेत, मराठी कलाकार आहेत. त्यांना सपोर्ट करावा लागेल. बरेचसे नेते मुंबईत भाषेचा वाद पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. सिद्धार्थजी आमच्या अमरावती कोणी एकदा येऊन थांबत नाही. तुम्हाला नेहमी यावं लागेल. आम्हाला तुम्हाला दरवर्षी बोलवायचं आहे.
सिद्धार्थ जाधव म्हणाला, नवनीत मॅम तुम्ही आमंत्रण दिलंय तर आम्ही दरवर्षी येणार आहोत. मी यावेळी माझ्या सिनेमाचे डायलॉग बोलून दाखवतो. रवी सर (रवी राणा) आता थांबायचं नाही. माझ्या कारकिर्दीतील हे पंचविसावं वर्ष आहे. प्रत्येक मराठी कलाकारावर प्रेम करा. नवनीत मॅम पुढच्या वर्षी देखील मी नक्की येणार..
इतर महत्त्वाच्या बातम्या
























