एक्स्प्लोर

10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं 15 ते 19 जानेवारी दरम्यान आयोजन; कशी असेल कार्यक्रमाची रुपरेषा?

Ajanta Verul International Film Festival: दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान आयोजन करण्यात आलं असून जगभरातील 65 फिल्म्सचं प्रदर्शन केलं जाणार आहे.

10th Ajanta Verul International Film Festival: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, 15 जानेवारी ते रविवार, 19 जानेवारी 2025 या दरम्यान हा महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. 

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. डेलीहंट डिजीटल पार्टनर आहेत.  सॉलीटेअर टॉवर्स हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अ‍ॅकॅडमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम 90.8 हे रेडिओ पार्टनर आहेत.

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश

आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट मराठी  रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे. 

भारतीय सिनेमा स्पर्धा

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक आणि एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे. 
भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीच्या अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री सीमा बिस्वास (गुवाहाटी) या असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार सी. के. मुरलीधरन (मुंबई), ज्येष्ठ संकलक दिपा भाटीया (मुंबई), ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी (कोचीन) आणि ज्येष्ठ पटकथा लेखक आणि अभिनेते गिरीश जोशी (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत. 

फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील आताच्या पिढीतील ज्या दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील पहिले अथवा द्वितीय सिनेमे असणार आहेत, त्यांचे विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका व चित्रपट समीक्षक लतिका पाडगांवकर व शीलादित्य सेन (पश्चिम बंगाल), जी. पी. रामचंद्रन (केरळ) हे मान्यवर या समितीत सदस्य  असणार आहेत. 

कालिया मर्दन विशेष प्रदर्शन, उद्घाटन सोहळा आणि जीवन गौरव पुरस्कार

महोत्सवाच्या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजन समितीच्या वतीने  रसिकांना एका विशेष  कार्यक्रमाची भेट दिली जाणार आहे. भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिध्द मुकपट ‘कालिया मर्दन’ याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी संपन्न होणार आहे. शंभर वर्षांपूर्वीचे मुकपट सिनेगृहात प्रत्यक्ष संगीताद्वारे (लाईव्ह ऑर्केस्ट्रा) दाखविले जात. तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील ‘सतब्दीर सब्द’ या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला जाणार आहे. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात बुधवारी, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायं. ५ वा. या मुकपटाचे प्रदर्शन करण्यात येईल. कालिया मर्दन विशेष प्रदर्शन व उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश खुला असेल. 
यानंतर लगेचच याच ठिकाणी चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची उपस्थिती असणार आहे. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामाकृष्णन, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तामिळ भाषेतील फिल्म ‘लिटील जाफना’ फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल.

समारोप सोहळा 

फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता पीव्हीआर आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. सुप्रसिध्द नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान, ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी आणि आयोजन समितीचे मानद अध्यक्ष प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल. सुवर्ण कैलास पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतील महत्वपूर्ण फिल्म ‘द सीड ऑफ सॅक्रेड फिग’ (पर्शियन) दाखविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा 

  • महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत पीव्हीआर आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता पानसिंग तोमर, हासिल, साहब बीबी और गँगस्टर यांसारखे अनेक महत्वपूर्ण सिनेमांचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग हे त्यांच्याशी संवाद साधतील.
  • गुरूवार, 16 जानेवारी 2025 रोजी सायं 6 वाजता प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची ‘स्वदेसची वीस वर्षे...’ ही प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिध्द नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांच्याशी संवाद साधतील.
  • शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता 'ओटीटी माध्यमांवरील बदलता सिनेमा' या विषयावर परीसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध भारतीय भाषांमधील महत्वपूर्ण चित्रपट दिग्दर्शकांचा यात सहभाग राहील. 
  • शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी सायं. 6 वाजता ‘मराठी भाषा अभिजात दर्जा आणि मराठी चित्रपट’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लेखिका लतिका पाडगांवकर, प्रसिध्द अभिनेते सुबोध भावे, लेखक क्षितिज पटवर्धन, चित्रपट महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सांवलकर, प्रसिध्द दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. महोत्सव संचालक सुनील सुकथनकर या चर्चेचे संवादक असतील.
  • शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता ‘आधुनिक सिनेमातील तंत्र भाषा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी, ज्येष्ठ छायाचित्रकार सी. के. मुरलीधरन, ज्येष्ठ संकलक दिपा भाटीया, ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी यांचा सहभाग असणार आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे या चर्चेचे संवादक असतील.
  • शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे. 
  • रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता इंडिया फोकस या चित्रपट विभागातील दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे. 
  • रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता हिंदी सिनेमांमधील प्रसिध्द नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांच्या मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्याशी संवाद साधतील. 

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा 

महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्‍या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख २५,००० रूपये देऊन गौरविण्यात येणार आहे. 

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा 

चित्रपट महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता छत्रपती संभाजीनगर शहरात पंचवीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन चित्रपट समीक्षकांच्या उपस्थितीत 6 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आले आहे. 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात रसिकांनी भरभरून सहभाग नोंदवावा, असं आवाहन महोत्सवाचे संस्थापक आणि संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग आदींनी केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget