एक्स्प्लोर

Zilla Parishad Panchayat Samiti Election: निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी करणार? समोर आली मोठी अपडेट

Zilla Parishad Panchayat Samiti Election: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कधी जाहीर होणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Zilla Parishad Panchayat Samiti Election: राज्यभरात 29 महापालिकांच्या निवडणुकांची (Municipal Election) रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकांच्याही (Panchayat Samiti Election) हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगातील (Maharashtra Election Commission) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यावेळी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी प्रक्रिया, चिन्ह वाटप असे टप्पे पूर्ण झाले असून आता प्रचाराला रंग चढू लागला आहे. मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असून, मतदान आणि मतमोजणी हे दोनच टप्पे उरले आहेत. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

Zilla Parishad Panchayat Samiti Election: आरक्षण मर्यादेतील संस्थांवर आयोगाचा भर

राज्यात एकूण 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या आहेत. यापैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये आणि 88 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाच्या मर्यादेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.

Zilla Parishad Panchayat Samiti Election: महापालिका निवडणुकांमुळे यंत्रणा व्यस्त

सध्या जवळपास 29 जिल्ह्यांतील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा महापालिका निवडणुकांमध्ये गुंतलेली आहे. काही महापालिकांमध्ये निर्माण होणारी तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, अतिरिक्त अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महापालिका निवडणुकांनंतर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 31 जानेवारीपूर्वी या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, त्या पार्श्वभूमीवर निवडणुकांची घोषणा लवकरात लवकर होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. एकूणच, महापालिका निवडणुकांच्या धामधुमीतच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा कधी होते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Santosh Dhuri joins BJP: राज ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराला भाजपच्या कोणत्या नेत्याने गळाला लावलं? संतोष धुरींनी मनसे सोडण्याचं कारण स्पष्टच सांगितलं

Samarjit Ghatge Kolhapur: मोठी बातमी : समरजित घाटगेंची घरवापसी, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Embed widget