एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Worli Vidhan Sabha Constituency: आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत

Worli Vidhan Sabha Consituncy: वरळीत आदित्य ठाकरेंचा विजय झाला आहे. आदित्य ठाकरेंनी मिलिंद देवरा, संदीप देशपांडे यांचा पराभव केला आहे.

Worli Vidhan Sabha Consituncy Result : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरेंसमोर शिवसेनेच्या (शिंदे गट) मिलिंद देवरा आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांचं आव्हान होतं. पण या दोन्ही उमेदवारांचं आव्हान संपुष्टात आणत आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे. 

विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपासूनच वरळी मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर, आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडेंना तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी देण्यात आली होती. तिन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरस रंगली होती. 

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. विद्यमान आमदार वि. महायुती आणि मनसे अशी लढत चुरशीची ठरली. मिलिंद देवरा लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आले आणि शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर खासदारही केलं. पण वरळीतून टक्कर देणारा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मिलिंद देवरा यांना पुढं केलं.

मुंबईतील वरळी मतदारसंघानं कायमच शहराच्या आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई शहरातील प्रमुख भागांना जोडणाऱ्या या भागामुळं हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा. सुरुवातीला या मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा होता. 2014 च्या निवडणुकीत मात्र इथं शिवसेनेनं पुन्हा आपली जागा मिळवली. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघात गतकाळातील निवडणुकीत 89248 मतांनी घवघवीत यश मिळवलं. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापुढं मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं आव्हान असल्यामुळं या तिरंगी लढतीकडे सर्वांचंच लक्ष असेल. 

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते. तेव्हा महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेतर्फे आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला होता. पण यंदा मात्र ( 2024च्या निवडणुकीत) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा उमेदवार उतरवला. मनसेने संदीप देशपांडे यांना तिकीट दिलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोर दोन तगड्या उमेदवारांचं आव्हान होतं. वरळी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. वरळीत अमराठी मतंही मोठी असून देवरांनी अमराठी मतांवर पकड आहे. वरळीत गुजराती मतदारांचीही संख्या निर्णायक ठरु शकतात. 2019 मध्ये सोप्या लढाईत आदित्य ठाकरे यांनी 89 हजार 248 मतं घेत विजय मिळवला होता. पण नुकत्याच झालेल्या दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत, वरळीतून ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी फक्त 6175 मतांवर आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Embed widget