एक्स्प्लोर
Advertisement
शनिवार-रविवार सुट्टी, सोमवारी मतदान, मुंबईकर हक्क बजावणार का?
शनिवार-रविवारला जोडून सुट्ट्यां आल्या तर मुंबईबाहेर फिरण्यासाठी बाहेर जातात. तसेच अशा वेळी मुंबईकरांचा गावाकडे जाण्याचा कलही जास्त असतो. त्यामुळेच मुंबईकरांना बाहेर जाण्यापासून थांबवण्यासाठी निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.
मुंबई : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबई शहर व उपनगरातील सहाही मतदारसंघांत सोमवारी 29 एप्रिलला मतदान होणार आहे.
मतदानाच्या दिवशी सरकारी, निमसरकारी कार्यालयांना सुट्टी असते. तसेच शनिवार, रविवारीही सुट्टी असते. या वेळेच्या लोकसभा निवडणुकांच्या मतदानासाठी शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग तीन सुट्टी आल्या आहेत. त्यामुळेच आता मुंबईकर मतदानाला मुंबईत थांबणार की नाही अशी साशंकता निर्माण झाली आहे. तर निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांपुढे मुंबईकरांना मतदानासाठी थांबवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. याआधीही सलग सुट्ट्याच्या काळात मुंबईत मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळाला आहे.
दरम्यान शनिवार-रविवारला जोडून सुट्ट्यां आल्या तर मुंबईबाहेर फिरण्यासाठी बाहेर जातात. तसेच अशा वेळी मुंबईकरांचा गावाकडे जाण्याचा कलही जास्त असतो. त्यामुळेच मुंबईकरांना बाहेर जाण्यापासून थांबवण्यासाठी निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.
VIDEO | लोकसभेचं बिगुल वाजलं, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया | एबीपी माझा
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात कधी होणार मतदान?
महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) रोजी 48 पैकी 07 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान होणार आहे तर चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान होणार आहे.
VIDEO | लोकसभा निवडणूक 2019 जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया | मुंबई | एबीपी माझा
महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान
पहिला टप्पा 07 जागांवर मतदान (11 एप्रिल)
वर्धा
रामटेक
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमुर
चंद्रपूर
यवतमाळ-वाशिम
दुसरा टप्पा (18 एप्रिल) 10 जागांवर मतदान
बुलढाणा
अकोला
अमरावती
हिंगोली
नांदेड
परभणी
बीड
उस्मानाबाद
लातूर
सोलापूर
तिसरा टप्पा (23 एप्रिल) 14 जागांवर मतदान
जळगाव
रावेर
जालना
औरंगाबाद
रायगड
पुणे
बारामती
अहमदनगर
माढा
सांगली
सातारा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
कोल्हापूर
हातकनंगले
चौथ्या टप्पा (29 एप्रिल) 17 जागांवर मतदान
नंदुरबार
धुळे
दिंडोरी
नाशिक
पालघर
भिवंडी
कल्याण
ठाणे
मुंबई उत्तर
मुंबई उत्तर पश्चिम
मुंबई उत्तर-पूर्व
मुंबई उत्तर मध्य
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई दक्षिण
मावळ
शिरुर
शिर्डी
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement