एक्स्प्लोर

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ट्विटरवरुन माहिती

सव्वा कोटी भारतीयांसाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं हार्दिकने सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या 12 मार्चला प्रवेश करतील. हार्दिक पटेलने स्वत: ट्विटरवरुन या बद्दलची माहिती दिली. सव्वा कोटी भारतीयांसाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं हार्दिकने सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. पंतप्रधान मोदींच्या घरच्या मैदानाकडे काँग्रेसने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गुजरातमधून तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. म्हणूनचं हा निर्णय घेण्यात आला. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती. जामनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या जपच्या पूनमबेन माडम खासदार आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रमभाई अहिर यांचा जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता. दरम्यान, 2015 मध्ये हार्दिक पटेल जेव्हा पाटीदार आंदोलन करत होता. त्यावेळी लोक त्याच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेलने आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. पण कोणत्या पक्षाच्या वतीने उभारणार हे त्यांनी सांगितले नव्हते. पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारचा विरोध करत गुजरातमधील स्थानिक स्वराज संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. VIDEO | लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात मतदान 23मे रोजी निकाल | नवी दिल्ली | एबीपी माझा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात मतदान 23मे रोजी निकाल दरम्यान देशाचा पुढचा चौकीदार कोण असणार आहे नरेंद्र मोदी, राहल गांधी की आणखी कोणी, या प्रश्नाचं उत्तर 23 मे रोजी मिळणार आहे, कारण लोकसभेचं बिगुल वाजलं असून 11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय. नवी महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांमध्ये, म्हणजे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडेल. संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर, जामनगरमधून निवडणूक लढवण्याची चिन्हं हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार सांगलीत हार्दिक पटेलच्या उपस्थितीत धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार हार्दिक पटेलला दोन वर्षांची शिक्षा

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget