एक्स्प्लोर

Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं

Ajit Pawar: आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला दिसेलचं, असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळल्याचं दिसून आलं.

पुणे: दिवाळी म्हटलं की, बारामतीत पवार कुटुंबीय एकत्रित येण्याचा क्षण असतो. मात्र आधी लोकसभा आणि आता विधानसभेत पवार कुटुंबियांत राजकीय कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळं आता या दिवाळीत पवार कुटुंबीय एकत्रित येतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला दिसेलचं, असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळल्याचं दिसून आलं.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः नाना काटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले चर्चेनंतर जेव्हा ते जाण्यासाठी निघाले तेव्हा, माध्यमांशी अजित पवारांनी संवाद साधला त्यावेळी, सुप्रिया सुळे असं म्हणताच भाऊबीजबद्दल पत्रकार विचारतील हे हेरून दादांनी काढता पाय घेतला. पुरंदरमध्ये अजित पवारांनी उमेदवार दिल्यानं विजय शिवतारेंनी टीका केली. मला महायुतीत एकोपा ठेवायचा आहे, असं म्हणत त्यांच्यावर इतर नेते उत्तर देतील असं अजित पवार म्हणालेत. चिंचवडमधील तिढा सोडविण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी नाना काटे यांची भेट घेतली. मात्र काटे माघार घेणार का? यावर ही चार तारखेला चित्र स्पष्ट होईल असं दादा म्हणाले. 

दुसरीकडे मावळ विधानसभेत सुनील शेळकेंचा प्रचार करायला देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते येतील असा दावा ही अजित पवारांनी केला आहे. मावळ पॅटर्न अडचणीचा ठरेल का? असं विचारलं असता, थोड्या दिवसांत तोडगा निघेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

अजित दादांच्या मनधरणी नंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम

चिंचवड विधानसभेतील नाना काटे यांची बंडखोरी रोखण्यासाठी स्वतः अजित पवार यांच्या घरी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा ही झाली, मात्र त्यानंतर ही काटे बंडखोरीवर ठाम आहेत. भाजपचे शंकर जगताप आणि शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्या विरोधात काटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. 

नाना काटे अपक्ष लढणार

महायुतीकडून चिंचवडची जागा भाजपला सुटली, भाजपने शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेले नाना काटे यांना शेवटी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. त्यामुळे महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget