Supriya Sule on Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी खूप धाडसी आहेत. त्यांना खरोखर मानलं पाहिजे. दिल्लीतील अदृश्य शक्तीला आपण कशाला घाबरायचं, लढायचे की घाबरायचं हे बघा असा टोला सुद्धा लगावला.
Supriya Sule on Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांनी कोणती गुरूदक्षिणा दिली ते सांगावं, असा माझा थेट सवाल असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आज (4 नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली. अदृश्य शक्तीने हसन मुश्रीफ यांच्यावर काय जादू केली, काही माहीत नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. हसन मुश्रीफ यांनी यांच्या पत्नीवरूनही सुप्रिया सुळे यांनी टोला लागायला.
समरजित घाटगे आता कागलचे आमदार होतील
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी खूप धाडसी आहेत. त्यांना खरोखर मानलं पाहिजे. दिल्लीतील अदृश्य शक्तीला आपण कशाला घाबरायचं, लढायचे की घाबरायचं हे बघा असा टोला सुद्धा हसन मुश्रीफ यांना लगावला. गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ यांनी मी शरद पवारांना करून गुरुदक्षिणा दिल्याचं सातत्याने सांगत आहेत. मात्र समरजित घाटगे यांनी फडणवीस यांचा विश्वासघात केल्याची टीका सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज कोल्हापूर दौऱ्यामध्ये यांना कोणती गुरुदक्षिणा दिली हे सांगावं, असे म्हणाल्या. दरम्यान, आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांची कागल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे आणि कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. हे दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. घाटगे यांच्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, गेल्या खूप वर्षांपासून माझं समरजित घाटगे यांच्यावरती लक्ष होतं. त्यांना मी नेहमीच म्हणायचे की, आमच्याकडे या. आता ते कागलचे आमदार होतील, असा विश्वास सुद्धा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व आज भाजपमध्ये
तपास यंत्रणांवरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, तपास यंत्रणांचा वापर फक्त सत्तेसाठी करू नये. 90 टक्के झालेली कारवाई फक्त विरोधकांवर झाली आहे. हे केवळ महाराष्ट्रामध्ये नसून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व आज भाजपमध्ये असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान अजित पवार यांनी तासगावमध्ये केलेल्या वक्तव्याचा सुद्धा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, ज्यांच्यावर 70 हजार कोटींचे आरोप आहेत त्यांना देवेंद्र फडणीस यांनी सही कशी करून दाखवली? फडणवीस यांनी राज्यातील सगळ्या जनतेला फसवलं आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी सुद्धा केली. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्या संदर्भातील फाईल विरोधकांना कशी काय दाखवले जाते? असा सवाल सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या