Washim News : वाशिममध्ये पंजा, रिसोडमध्ये कमळ तर कारंजामधून घड्याळ-धनुष्यबाण गायब; पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम
Washim News : वाशिम जिल्ह्यातील तीनविधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची चिन्हं EVM मधून गायब झाल्याने त्या त्या पक्षांच्या पारंपरिक मतदानामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
वाशिम : विधानसभा निवडणुकीचे जोरात व्हायला लागले प्रचार आता अंतिम टप्प्यात आले आहेत. मात्र, 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये गेल्या काही वर्षापासून मतदारांना ओळखीचे असलेले चिन्ह गायब झाल्याच चित्र या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच पक्षाला मतदान करणारे मतदार मात्र काहीसे संभ्रमित होण्याची शक्यता आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघात नेहमी ईव्हीएम मशीनवर भाजप पक्षाचं चिन्ह कमळ पाहायला मिळत होत. मात्र, ते यावेळेस मतदानाच्या यादीतून म्हणजेच EVM मशीनवरून गायब होणार आहे. तर वाशिम विधानसभा मतदारसंघात नेहमी म्हणजेच दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पंजा ही निशाणी मतदारांना दिसत होती. मात्र ती यावेळेस ईव्हीएम मशीनवर नसणार आहे. तर कारंजा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्ये नेहमी राष्ट्रवादीचे घड्याळ आणि धनुष्यबाण पाहायला मिळत होते. मात्र, ती निशाणी यावेळेस ईव्हीएम मशीन पाहायला मिळणार नाही.
राज्यातील प्रमुख दोन प्रादेशिक पक्ष फुटले आणि त्यांचे विभाजन झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आणि तुतारी असे राष्ट्रवादीची दोन गट पडले. तर शिवसेनेचे धनुष्यबाण आणि मशाल असे दोन गट पडले. भाजपसोबत या दोन्ही पक्षाची युती झाली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची महाविकास आघाडी झाली. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी हक्काचे चिन्ह जे मतदारांसाठी ओळखीचे होते ते आता दिसणार नाही. त्यामुळे एका पक्षाचं पारंपरिक मतदान नेमकं कोणत्या दुसऱ्या पक्षाला जातं आणि त्याचा प्रत्यक्षात फायदा कसा मिळतो ते पाहावं लागेल.
फोडाफोडी आणि बदललेली राजकीय परिस्थिती ही मतदाराला संभ्रमात टाकणारी असली तरी मात्र राज्याच्या राजकारणात ही कलाटणी देणारी किंवा धक्कातंत्र ठरणारी निवडणूक असणार आहे. त्यामुळे तोडफोडीच्या राजकारणामुळे आणि अनैसर्गिक आघाड्या आणि युतीमुळे लोकशाहीचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळतंय. या सर्व गोष्टीला राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष तितकेच जबाबदार असल्याने मतदारांमध्ये त्याचा रोष कोणत्या पद्धतीने पाहायला मिळतो किंवा कुणाला याचा फायदा होताना दिसते हे 23 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा: