जालन्यात महायुतीत बंडखोरी, अर्जुन खोतकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, भास्कर दानवे माघार घेणार का?
जालना विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज अर्जुन खोतकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत.
Arjun Khotkar meets Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळं नेत्यांची डोखेदुखी वाढली आहे. जालना विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्याविरोधात रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे (Bhaskar Danve) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज खोतकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरु
शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी अर्जुन खोतकर पोहोचले आहेत.
जालन्यात महायुतीत बंडखोरी झाली आहे. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीतील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच अर्जुन खोतकर हे नागपूरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले आहे.
महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता
भास्कर दानवे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पदावर आहेत. भाजप कार्यकर्त्यांसोबत दुचाकी रॅली काढत भास्कर दानवेंनी अर्ज भरला आहे. मैत्रिपूर्ण लढतीसाठी आम्ही आग्रही असल्याची भूमिका भास्कर दानवे यांनी घेतली आहे. दरम्यान, जालना विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटला आहे. त्यामुळं या मतदारसंघातून अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, या जागेवर भाजपने देखील दावा केलाय. त्यामुळं या जागेवरुन महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीय. जालन्याची जागा ही महायुतीत भाजपला सोडण्यात यावी यासाठी दानवे आग्रही होते. मात्र ही जागा परंपरागत शिवसेनेकडे असल्यानं खोतकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले भास्कर दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅली काढत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज भरायला आणखी चार दिवस बाकी असून अजूनही भाजपला ही जागा सोडतील अशी आशा भास्कर दानवे यांनी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात 2009 पासून काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) अशीच दुहेरी लढत होत आलेली आहे. तेव्हापासून आलटून पालटून या दोन्ही उमेदवारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. कैलास गोरंट्याल हे देखील यावेळी पुन्हा मैदानात उतरले आहेत.
महत्वाच्या बातम्या: