(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidhan Sabha Election 2024 : उल्हासनगरमध्ये पुन्हा कलानी Vs आयलानी संघर्ष; शरद पवार गटाकडून ओमी कलानी यांना उमेदवारी
Ulhasnagar Vidhan Sabha Election 2024 : बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर उल्हासनगर विधानसभेसाठी ओमी कलानी यांनी राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
Ulhasnagar Vidhan Sabha Election 2024 : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर उल्हासनगर विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओमी कलानी (Omi Kalani) यांना उमेदवारी जाहीर झाली. महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर उल्हासनगरमध्ये एकच जल्लोष दिसून आला.
कोण आहेत ओमी कलानी?
ओमी कलानी हे राष्ट्रवादीच्या माजी आमदार दिवंगत ज्योती कलानी यांचे चिरंजीव आहेत, तर नामचीन माजी आमदार पप्पू उर्फ सुरेश कलानी यांचे सुपुत्र आहेत. ओमी कलानी उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत टीम ओमी कलानी घेऊन निवडणुकीत उतरले होते. ओमी यांनी भाजप शिवसेनेला साथ दिल्याने पत्नी पंचम कलानी या उल्हासनगर मनपाच्या महापौर झाल्या होत्या.
उल्हासनगरचा इतिहास काय?
2019 मध्ये उल्हासनगर विधानसभेत भाजपाचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांचा अवघ्या दोन हजार मतांनी विजयी झाला होता. दिवंगत ज्योती कलानी यांना 2019 च्या निवडणुकीत 41,662 मतं मिळाली होती, तर कुमार आयलानी यांना 43,666 मतं मिळाली होती.
कलानी Vs आयलानी संघर्ष
भाजपच्या कुमार आयलानी (Kumar Ailani) यांनी 2009 साली पप्पू कलानी यांचा पराभव केला होता. नंतर मात्र 2014 मध्ये मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांनी आयलानी यांचा पराभव केला. तर 2019 मध्ये आयलानी यांनी ज्योती कलानी यांचा निसटता पराभव केला. सध्याच्या 2024 विधानसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ओमी कलानी यांना उमेदवारी दिल्याने पुन्हा एकदा 'कलानी विरुद्ध आयलानी' संघर्ष पाहायला मिळणार आहे.
काय आहे सध्याची स्थिती?
सध्याच्या घडीला ओमी कलानी यांचा उल्हासनगर शहरावर दबदबा आहे. ओमी कलानी यांचे वडील पप्पू उर्फ सुरेश कलानी हे इंदर भटीजा हत्या प्रकरणी नाशिक जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांची पत्नी माजी आमदार दिवंगत ज्योती कलानी यांचं निधन झालं आणि पप्पू उर्फ सुरेश कलानी पॅरोलवर बाहेर आले आणि तेव्हापासून ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. आपला मुलगा ओमी यांना राजकारणी डावपेच शिकवत त्यांनी भविष्यासाठी घडवलं आहे.
2019 च्या निवडणुकीत पप्पू कलानी उर्फ सुरेश कलानी जेलमध्ये होते. मात्र 2024 च्या निडणुकीत स्वतः कलानी मैदानात उतरून मुलाचा प्रचार करणार आहेत, त्यामुळे उल्हासनगर विधानसभेचा दावेदार कोण ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा: