एक्स्प्लोर

Election : विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रवीण दरेकर यांचे नाव निश्चित, इतर तीन जागांवर कुणाला संधी मिळणार?

Vidhan Parishad Election : प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपा शंकर सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत.

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षाची धावपळ सुरू आहे. असं असताना आता भाजपमध्ये विधानपरिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपमध्ये तर आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली असून, याची यादी बरीच मोठी आहे. विधान परिषदेवर भाजपचे चार जण सहज निवडून जाणार असल्याने या चार जागासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहेत. प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले आहे अशी सूत्रांची माहिती आहे. 

भाजपकडून कुणाला संधी मिळणार?
विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपमध्ये बऱ्याच जणांची लॉबिंग सुरू असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी कुणाला तरी एकाला पुन्हा विधान परिषदेची संधी मिळू शकते.

हे नेते देखील इच्छुक
एकीकडे प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपा शंकर सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपच्या वरिष्ठांकडून चार जागेसाठी कुणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. 

यांना संधी मिळण्याची शक्यता कमी
विधान परिषदेच्या चार जागांसाठी बऱ्याच नेत्यांची लाईन लागली असली तरी काही नेत्यांना या वेळी संधी मिळण्याची शक्यता नाही. यामध्ये शिवसंग्रामचे विनायक मेटे, सुरजित सिंह ठाकूर यांना विधान परिषदेत पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही.

असे आहे जागाचे गणित
विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहे. त्यामुळे भाजपच्या सहज चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळेच आता या चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. 

भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवण्याची शक्यता
महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता, राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता असल्याचा माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. भाजपला फक्त 13 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget