राजकीय वैर संपायला हवं, उत्तम जानकर 19 तारखेला निर्णय घेतील, पवारांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील?
आज उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. येत्या 19 तारखेला उत्तम जानकर हे पुढचा निर्णय घेतील अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.
Dhairyasheel Mohite Patil : माढा लोकसभा मतदारसंघात (madha loksabha election) वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) असा सामना रंगणार आहे. अशातच माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर (Uttam Jankar) हे कोणाला पाठिंबा देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये भेट घेतल्यानंतर आज जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी पवारसाहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. 19 तारखेला मेळावा होणार आहे. त्यातूनउत्तमराव जानकर हे पुढचा निर्णय घेतील अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे.
रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीसोबत, मात्र त्यांचे कुटुंब आमच्यासोबत : मोहिते पाटील
माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांचे राजकीय वैमनस्य आहे. मात्र, भाजपने विधानसभेसह सोलापूर लोकसभेचं तिकीट न दिल्यामुळं उत्तमराव जानकर देखील नाराज आहेत. त्यामुळं उत्तमराव जानकर हे आता भाजपला पाठिंबा देणार की मोहिते पाटील यांनी हा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, शरद पवार यांची भेट झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजकीय वैर संपायला पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीसोबत आहेत. त्यांचे सर्व कुटुंब आमच्यासोबत असल्याचे मोहिते पाटील म्हणाले. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून मी चांगल्या मताने निवडून येईल असा विश्वास यावेळी मोहिते पाटलांनी व्यक्त केला. मी किती मताने निवडून येईल हा आकडा बाळदादा योग्य दिवशी सांगतील असंही मोहिते पाटील म्हणाले.
भाजपने माझ्यावर अन्याय केला : उत्तम जानकर
दरम्यान, भाजपने माझ्यावर अन्याय केला आहे. इतके वर्ष मोहिते पाटलांना विरोधात संघर्ष केल्यानंतर देखील मागील वेळी विधानसभेला मला उमेदवारी नाकारल्याचे उत्तम जानकर म्हणाले. दरम्यान, मी अजुनही अजित पवार यांच्याच पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे जानकर म्हणाले. सध्या माढा लोकसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदारसंघातील मोहिते पाटील कुटुंबाने शरद पवार गटात प्रवे केल्यानं भाजपला हादरा बसला आहे. त्यामुळं राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
Uttam Jankar : विशेष विमानानं नागपूरला जाऊन फडणवीसांची भेट, उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला, माढ्यात नवा ट्विस्ट