UP Election Result 2022 Live Updates :  उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मानले जनतेचे आभार

UP Election Result 2022 Live Updates : सध्या भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत भाजप सत्ता राखणार का? की, सत्तापालट होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Mar 2022 06:10 PM
UP Election Result 2022:  उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मानले जनतेचे आभार

संपूर्ण देशाचं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडं लक्ष लागलं होतं. आम्हाला बहुमतानं विजयी केल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेचे आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही यूपी, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

UP Election Result 2022:  लखनौ येथील भाजप कार्यलयात कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे इतर नेते लखनौमधील पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. 


UP Election Result : अखिलेश यादव यांचा 61 हजार मतांनी विजय

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून, कऱ्हालमधून 61,000 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

 Uttar Pradesh Election 2022: समाजवादी पक्षाच्या स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का

भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना फाजिलनगर मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भाजपच्या सुरेंद्र कुमार कुशवाहा यांनी त्यांचा पराभव केला आहे.

BSP in Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशात बसपाचा हत्ती 'बसला'; आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी

BSP Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातींच्या समुदायाच्या आधारे बहुजनांचे राजकारण करणाऱ्या बहुजन समाज पक्षाची कामगिरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय वाईट राहिली. सध्याच्या कलानुसार बसपाला उत्तर प्रदेशात दोन अंकी जागादेखील गाठता आली नाही. बसपाची आतापर्यंतची ही वाईट कामगिरी आहे.  उत्तर प्रदेशची सत्ता एकहाती खेचणाऱ्या बसपाच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मागील लोकसभा निवडणुकीत बसपाला मागील मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने बसपासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती. मात्र, बसपाची कामगिरी अतिशय सुमार राहिली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणातून बसपा मुख्य पटलावरून अदृष्य राहिले असल्याचे दिसून आले. बसपा प्रमुख मायावती यादेखील प्रचारात फारशा सक्रिय राहिल्या नाहीत. त्यामुळे बसपाने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नसल्याची चर्चा होती. 

UP Election Result : अब की बार फिर योगी सरकार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, तर काँग्रेसचा सुपडा साफ

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (Uttar Pradesh) सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप (BJP) आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. भाजपनं पहिल्या दोन तासांच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपला 222 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाची आघाडीही निवडणुकांमध्ये 'काँटे की टक्कर' देत आहेत. समाजवादी पक्ष 111 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर, निवडणूक आयोगाच्या मते, सपाला 31 टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला 42 टक्के मते मिळाली आहेत. 

5 State Election Results 2022 : दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 'हे' दिग्गज पिछाडीवर, योगींची मात्र मोठी आघाडी
UP Election Result 2022 Live Updates : इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, अखिलेश यादवांचं ट्वीट

इम्तिहान बाकी है अभी हौसलों का
वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का ...


मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुकपणे आणि सतर्कतेने कार्यरत राहिल्याबद्दल सपा-आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे, नेते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार!


'लोकशाहीचे पाईक' विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततील!


अखिलेश यादव
सपा अध्यक्ष





UP Election Result 2022 Live Updates : गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आघाडी कायम, तर अखिलेश यादवही पुढे

 UP Election Result 2022 Live Updates : गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आघाडी कायम, तर अखिलेश यादवही पुढे 

UP Election Result 2022 Live Updates : कुंडा मतदारसंघातून राजा भैया आघाडीवर

UP Election Result 2022 Live Updates : कुंडा मतदारसंघातून राजा भैया (Raja Bhaiya) आघाडीवर, यूपीतील 189 जागांचे सुरुवातीचे कल हाती 

UP Election Result 2022 Live Updates : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून पुढे, अखिलेश यादवांचीही आघाडी, यूपीत 110 जागांहून अधिक ठिकाणी भाजप आघाडीवर 


UP Election Result 2022 Live Updates : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून पुढे, अखिलेश यादवांचीही आघाडी, यूपीत 110 जागांहून अधिक ठिकाणी भाजप आघाडीवर 




 

UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये भाजप 11 जागांवर आघाडीवर, सुरुवातीचे कल हाती

UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये भाजप आठ जागांवर आघाडीवर, सुरुवातीचे कल हाती  #ElectionResults #ResultsOnABP  #UPElectionResult2022  


- उत्तर प्रदेश निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर  

UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये भाजप चार जागांवर आघाडीवर, सुरुवातीचे कल हाती

UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये भाजप चार जागांवर आघाडीवर, सुरुवातीचे कल हाती

UP Election Result 2022 Live Updates : काही क्षणात पहिला निकाल येणार, पोस्टल मतमोजणीला सुरुवात, निकालाआधीच अनेक ठिकाणी सेलिब्रेशन सुरु

UP Election Result 2022 Live Updates : काही क्षणात पहिला निकाल येणार, पोस्टल मतमोजणीला सुरुवात, निकालाआधीच अनेक ठिकाणी सेलिब्रेशन सुरु

UP Election Result 2022 Live Updates : 5 राज्यांचा सुपरफास्ट निकाल एकाच ठिकाणी #ResultsOnABP

5 राज्यांचा सुपरफास्ट निकाल एकाच ठिकाणी #ResultsOnABP


- पहिले कल काही क्षणात हाती - 
- उत्तर प्रदेशात कुणाची सत्ता?
- पंजाबमध्ये आप बाजी मारणार?
- गोव्याच्या मैदानात प्रचंड चुरस
-मणिपूर, उत्तराखंडमध्ये विजय कुणाचा? 


LIVE TV - https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

 UP Election Result 2022 Live Updates : सर्वात मोठा निकाल उत्तर प्रदेशचा, कोण बाजी मारणार? काही क्षणात कळणार कल...

 UP Election Result 2022 Live Updates : सर्वात मोठा निकाल उत्तर प्रदेशचा, कोण बाजी मारणार? काही क्षणात कळणार कल... 

UP Election Result 2022 LIVE : दिल्लीतील काँग्रेस भवनमध्ये अजूनही शांतता

पाच राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे....विजयाची खात्री बाळगत जवळपास सर्वच पक्षांची कार्यालय सजली आहेत. पाचही राज्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या उमेदवारांच्या घरी जल्लोषाचे वातावरण तयार झाले.  मात्र दिल्लीतील काँग्रेस भवनमध्ये अजूनही शांतता पाहायला मिळते... कोणताही नेता किंवा एकही कार्यकर्ता या कार्यालयाकडे फिरकला नाही... 

UP Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये EVM च्या देखरेखीसाठी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते रात्रभर जागे 


UP Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये EVM च्या देखरेखीसाठी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते रात्रभर जागे 


UP Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेश विधानसभेचे जलद आणि अचूक निकाल फक्त एबीपी माझावर 

UP Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे जलद आणि अचूक निकाल तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता. त्याशिवाय तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही पाहू शकता. 


ABP Majha You Tube LIVE :


ABP Majha LIVE TV : https://marathi.abplive.com/live-tv


ABP Majha WEB Site : https://marathi.abplive.com/

UP Election Result 2022 LIVE : गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय घडलं होतं?

UP Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये भाजपने मोठ्या फरकारने इतर पक्षांचा पराभव केला होता. मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

UP Election Result 2022 LIVE : एक्झिट पोल काय सांगतोय?

UP Election Result 2022 LIVE : निवडणुका जाहीर झाल्यानंतर यूपीमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या. अनेकांनी भाजपला रामराम करत समाजवादी पार्टीचा रस्ता झरला होता. विद्यमान योगी मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी देखील समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, एक्झीट पोलनुसार उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट होत आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलनुसार भाजप 228 ते 244 तर समाजवादी पक्ष 132 ते 148 जागा जिंकण्याची शक्यता आहे.

UP Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेशमध्ये गाजलेले मुद्दे

UP Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेशमध्ये गाजलेले मुद्दे



  • राम मंदिर निर्माण

  • शेतकरी आंदोलन

  • हाथरस बलात्कार प्रकरण

  • लखीमपूर हिंसाचार

  • गंगा किनाऱ्यावरचे मृतदेह

UP Election Result 2022 LIVE : यूपीमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला? 

UP Election Result 2022 LIVE : यूपीमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला? 



  • योगी आदित्यनाथ(भाजप) - गोरखपूर शहर 

  • चंद्रशेखर आझाद रावण (भीम आर्मी) - गोरखपूर शहर 

  • अखिलेश यादव (सपा)- करहल 

  • एस.पी. बघेल (भाजप)- करहल 

  • केशव प्रसाद मौर्य (भाजप- सिराथू 

  • डॉ. पल्लवी पटेल (सपा)-सिराथू 

  • शिवपाल यादव (सपा)- जसवंतनगर 

  • आझम खान (सपा)- रामपूर 

  • ओमप्रकाश राजभर (सपा+) - जहुराबाद 

  • कृष्णा पटेल (सपा+)- प्रतापगड 

  • स्वामी प्रसाद मौर्य (सपा)- फाझिलनगर 

  • दारा सिंह चौहान (सपा)- घोसी 

  • पंखुडी पाठक (काँग्रेस)- नोएडा 

  • राजेश्वर सिंह (भाजप)- सरोजिनीनगर 

  • आदिती सिंह (भाजप)- रायबरेली 

UP Election Result 2022 LIVE : यूपीमध्ये विधानसभेच्या 403 जागा, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 202 जागा जिंकाव्या लागणार

UP Election Result 2022 LIVE : यूपीमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 202 जागा जिंकाव्या लागणार आहेत. ज्या पक्षाला 202 जागा मिळवता आल्या तोच पक्ष यूपीचा कारभारी ठरणार आहे. यूपीमध्ये योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, चंद्रशेखर आझाद रावण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

UP Election Result 2022 LIVE : कोण होणार यूपीचा नवा कारभारी? आज फैसला

UP Election Result 2022 LIVE : राजकीयदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचे राज्य म्हणून उत्तर प्रदेशकडे बघितले जाते. कारण देशात सगळ्यात जास्त विधानसभेच्या जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तसेच लोकसभेच्या देखील सर्वात जास्त जागा यूपीमध्येच आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेशला एक वेगळे महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहे. या सर्व जागांचे निकाल आज स्पष्ट होणार आहे. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उत्तर प्रदेशचा नवा कारभारी कोण? याचा फैसला अवघ्या काही तासांमध्येच होणार आहे.

पार्श्वभूमी

UP Election Result 2022 Live Updates : सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता कोण स्थापण करणार याचा फैसला काही तासात होणार आहे. योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, चंद्रशेखर आझाद रावण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. सध्या भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणूकीत भाजप सत्ता राखणार का? की, सत्तापालट होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 


मॅजिक फिगर 202


देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. या 403 जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागा जिंकाव्या लागतील. जो पक्ष 202 जागा जिंकेल तो पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.


कुणाची प्रतिष्ठा पणाला? 



  • योगी आदित्यनाथ(भाजप) - गोरखपूर शहर 

  • चंद्रशेखर आझाद रावण (भीम आर्मी) - गोरखपूर शहर 

  • अखिलेश यादव (सपा)- करहल 

  • एस.पी. बघेल (भाजप)- करहल 

  • केशव प्रसाद मौर्य (भाजप- सिराथू 

  • डॉ. पल्लवी पटेल (सपा)-सिराथू 

  • शिवपाल यादव (सपा)- जसवंतनगर 

  • आझम खान (सपा)- रामपूर 

  • ओमप्रकाश राजभर (सपा+) - जहुराबाद 

  • कृष्णा पटेल (सपा+)- प्रतापगड 

  • स्वामी प्रसाद मौर्य (सपा)- फाझिलनगर 

  • दारा सिंह चौहान (सपा)- घोसी 

  • पंखुडी पाठक (काँग्रेस)- नोएडा 

  • राजेश्वर सिंह (भाजप)- सरोजिनीनगर 

  • आदिती सिंह (भाजप)- रायबरेली 


उत्तर प्रदेशमध्ये गाजलेले मुद्दे



  • राम मंदिर निर्माण

  • शेतकरी आंदोलन

  • हाथरस बलात्कार प्रकरण

  • लखीमपूर हिंसाचार

  • गंगा किनाऱ्यावरचे मृतदेह


एक्झिट पोल काय सांगतोय? 


उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलनुसार भाजप 228 ते 244 तर समाजवादी पक्ष 132 ते 148 जागा जिंकण्याची शक्यता आहे.


2017 साली भाजपला बहुमत


उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.