Up Election : उत्तर प्रदेशात येत्या 23 फेब्रुवारी रोजी चौथ्या टप्प्यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी चौथ्या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार देखील आता थांबला आहे. पहिल्या तीन टप्प्यात 403 मधील 172 जागांसाठीची मतदान प्रक्रिया आधीच पार पडली आहे. आता लखीमपूर खेरीसह 9 जिल्ह्यांमधील 59 विधानसभा जागांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 624 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.


चौथ्या टप्प्यात गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेली क्षेत्रातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याच मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याकडून पराभव झाला होता. चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या निवडणूक व्यवस्थापनेच्या कौशल्याचा कस लागणार आहे.  


2017 मध्ये कोणाला किती जागा मिळाल्या? 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनौ, उन्नाव, रायबरेली, फतेहपूर आणि बांदा जिल्ह्यात एकूण 59 विधानसभेच्या जागा आहेत. 16 जागा अनुसूचित जाती (एसी) उमेदवारांसाठी राखीव आहेत. उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानात 90 टक्के जागा भाजपकडे आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी 59 जागांपैकी 51 जागा जिंकल्या होत्या. तर एक जागा ही भाजपचा (BJP) मित्रपक्ष असलेल्या अपना दलने (एस) जिंकली होती. तसेच 2017 मध्ये समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) येथे फक्त चारच जागेवर समाधान मानव लागलं होत. तर काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या वाटेल दोन-दोन जागा आल्या होत्या. नंतर काँग्रेसच्या तिकिटीवर विजय मिळवलेल्या दोन्ही उमेदवारांनी आणि बीएसपीच्या (BSP) एका उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात येथील नऊ जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागांवर यश मिळवता येईल, हे येत्या 10 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे.  


महत्वाच्या बातम्या :