ICC T20 World Cup: आगामी टी20 विश्वचषकापूर्वी सध्या पात्रता फेरीचे सामने (T20 World Cup Global Qualifier) सुरु आहेत. दरम्यान यामध्ये काही नवी संघ दिसत असले तरी जर्मनीचा क्रिकेट संघ (Germany) हा सर्वांनाच आश्चर्यचकीत करत आहे. कारण फुटबॉल, हॉकी हे खेळ गाजवलेला जर्मनीचा संघ क्रिकेटमध्ये कधीच झळकलेला नाही. पण आता जर्मनीने आपली टीम ताकदवर बनवली असून यंदा ते टी20 विश्वचषकाच्या पात्रता फेरी सामन्यात ही खेळत आहेत. पण नुकताच आयर्लंड संघाने त्यांना मात देक सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. त्यामुळे जर्मनीचं यंदातरी विश्वचषक खेळण्याचा स्वप्न तुटलं आहे. विशेष म्हणजे जर्मनीचा कर्णधार भारतीय वंशाचा चेन्नईत जन्मलेला वेंकटरमन गणेशन (Venkatraman Ganesan) हा आहे.


ओमनच्या मैदानात सुरु असलेल्या आयर्लंड विरुद्ध जर्मनी (Ireland vs Germany) या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्य़ानंतर भेदक गोलंदाजी करत आयर्लंडने जर्मनीला 107 धावांमध्ये रोखलं. आयर्लंडने 7 विकेट गमावत 107 धावा केल्या. दरम्यान त्यानंतर जर्मनीच्या तुलनेत अनुभवी आयर्लंडने 13.1 षटकात अप्रतिम फलंदाजी करत निर्धारीत लक्ष्य पूर्ण केले. 41 चेंडू राखत 7 विकेट्सनी विजय मिळवला. 


जर्मनी क्रिकेट संघाला 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सीलं (ICC) सभासद पद मिळालं आहे. पण त्यांनी अधिक सामने खेळले नसून आता टी20 क्रिकेटमध्ये अलीकडे ते सक्रीय झाले आहेत. 11 मे, 2019 रोजी जर्मनी संघाने सर्वात पहिला टी20 सामना बेल्जियमविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता आयर्लंडविरुद्ध त्यांनी अखेरचा सामना आतापर्यंत खेळला आहे.  


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha