Mumbaikar : बॉक्स ऑफिसवर अनेक बिग बजेट सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. कोरोनामुळे अनेक सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहेत. विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) 'मुंबईकर' (Mumbaikar) सिनेमा आता मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'मुंबईकर' सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. गेल्या वर्षी एस एस राजामौली आणि करण जोहरने या सिनेमाची घोषणा केली होती. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षीच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 'मुंबईकर' सिनेमाचे निर्माते लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करू शकतात.





विक्रांत मेस्सीचा आगामी 'लव्ह हॉस्टेल' सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा ​​आणि बॉबी देओलदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विजय सेतुपतीचेदेखील अनेक सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


संबंधित बातम्या


Priyanka Chopra : प्रियांकाच्या आईने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला पतीसोबतचा जुना फोटो, निक जोनासच्या वडिलांनी केली कमेंट 


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित


Me Vasantrao : 'मी वसंतराव' ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला ; एक एप्रिल रोजी होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha