Rail Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना 400 वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा केली. येत्या तीन वर्षांत या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय या योजनेसाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार. यामुळं प्रवासाचा वेळ कमी होणार इंधनाचा खर्च कमी वाचणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले.


लोकसभेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, आम्ही पुढील चार प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. येत्या 3 वर्षांमध्ये 100  'पीएम गति शक्ती' कार्गो टर्मिनल विकसित केले जाणार आहेत. त्याशिवाय देशात मेट्रो जाळं विस्तारणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावरील आव्हानांचा सामना करत आहे मात्र या परिस्थितीत देखील भारतानं कोरोनो महासाथीच्या आव्हानांचा चांगला सामना केला आहे.  अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील 25 वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल. देशात आर्थिक रिकव्हरीला बळकट करण्यावर फोकस केला जाणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.  


या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया रचण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय.  आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं. 


'वंदे भारत एक्स्प्रेस' आहे तरी काय?



'वंदे भारत एक्स्प्रेस' ही भारताची सेमी हायस्पीड ट्रेन आहे. मेक इन इंडिया अंतर्गत 18 महिन्यात 100 कोटी खर्चून या सेमी हायस्पीडची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात यश आले. चेन्नईतील  इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये या एक्स्प्रेसची निर्मिती करण्यात आली.  'वंदे भारत एक्सप्रेस'चा कमाल वेग १३० किमी प्रति तास इतका आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली-वाराणसी दरम्यान ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली.