Indian Railways made new rules for passengers : रेल्वे प्रशासनाने नवीन कठोर नियम लागू केले आहेत. रेल्वेतून रात्री प्रवास करताना मोठ्यानं गप्पा मारल्या किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकली तर कारवाई करण्यात येणार आहे. तुमच्या सहप्रवाशानं झोपमोड झाल्याची तक्रार केली तर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. रात्री 10 नंतर हे नियम लागू असतील आणि रेल्वे प्रशासन त्याची कठोर अंमलबजावणी करणार आहे.


एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेने प्रवाशांसाठी नवे नियम जाहीर केले  आहे. या नव्या नियमानुसार प्रवास करताना आपल्या सहप्रवाशांना मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलता येणार नाही तसेच मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकता येणार नाही. प्रवाशांकडून या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आली त्यानंतर रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवाशांची झोप मोडणार नाही. 


रात्री 10 नंतरचे नवे नियम



  • रेल्वे प्रवासात मोठ्याने बोलण्यास, मोठ्या आवाजाने गाणी ऐकण्यास बंदी

  • रेल्वेतील 'नाईट लाइट' वगळता इतर सर्व लाइट बंद कराव्या लागणार

  • ग्रुपने प्रवास करणाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू नये


रेल्वेच्या या नव्या नियमानुसार जर रेल्वेत प्रवास करताना प्रवशाच्या तक्रारीचे निवारण करण्याची   झाले  जबाबदारी ही संबंधिक रेल्वे कर्मचाऱ्याची आहे. रेल्वे मंत्रालयाने हे आदेश सर्व झोनला दिले आहे. 


रेल्वेचे इतर नियम



  • रेल्वे प्रवास करताना जर तुम्ही विना तिकिट प्रवास करत असाल तर रेल्वे अॅक्ट कलम 138 नुसार तुम्हच्यावर कारवाई होऊ शकते.

  • जर कोणी रेल्वेच्या छतावरून प्रवास करत असेल तर त्याला कलम 156 नुसार तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि 500 रुपयांचा दंड लागू शकतो.

  • जर एखादा व्यक्ती रेल्वेच्या परिसरात पोस्टर लावतो तर त्याच्याविरोधात कारवाई होऊ शकते. त्याला सहा महिने तुरुंगवास आणि 500 रुपयांचा दंड होऊ शकतो.

  • अवैधपणे जर तुम्ही रेल्वेचे तिकिट विकत असाल तर तुम्हाला तीन वर्षांचा तुरुंगवास तसेच 10 हजार रुपयांचा दंड लागू शकतो.