एक्स्प्लोर
अंबाबाईच्या दर्शनाने युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापुरात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. त्यामुळे नेहमी ते प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. उद्धव ठाकरे यांचीही हीच इच्छा असल्याने युतीच्या सभेचं नियोजन कोल्हापुरात करण्यात आलं आहे
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरातून होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन उद्धव आणि फडणवीस प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा 28 मार्चला वर्ध्यात होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. त्यामुळे नेहमी ते प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. उद्धव ठाकरे यांचीही हीच इच्छा असल्याने युतीच्या सभेचं नियोजन हे कोल्हापुरातील तपोवन या मैदानावर करण्यात आलं आहे.
युतीच्या सभेसाठी जोरदार नियोजन करण्यात आलं असून सभेच्या दिवशी राज्यभरातून कार्यकर्ते येणार आहेत. गर्दीच्या कारणाने जर कार्यकर्त्यांना सभेपर्यंत पोहचता आले नाही तर त्यांच्यासाठी शहरातील प्रमुख चौकात 10 स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत.
ही सभा 'न भूतो न भविष्यति' सभा करुन कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा चंग पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा 28 तारखेला वर्ध्यात होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement