एक्स्प्लोर

Tirora Vidhan Sabha constituency: तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात दुहेरी लढत, कोण मारणार बाजी?

Tirora Vidhan Sabha constituency:  या मतदारसंघातही आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार असतानाच  वंचितचा जोरही दिसणार आहे.

Tirora Vidhan Sabha constituency:  गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा (Tirora Vidhan Sabha constituency) क्षेत्राकडे लक्ष दिल्यास या मतदारसंघात भाजपाचे विजय रांहागडाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रविकांत उर्फ गुड्डू बोपचे यांच्यामध्ये दुहेरी लढत होत आहे. मात्र या मतदारसंघातही महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागलाय. त्यातच वंचितचा जोरही पाहायला मिळतोय.  वंचिततर्फे अतुल गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया (Gondiya Assembly Constituency) जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते. या गोंदिया जिल्ह्यात मोठे कारखाने नसले तरी, अनेक छोट्या लघु उद्योगातून नागरिक स्वयंरोजगार निर्माण करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात मनोहर भाई पटेल यांच्यासारखे शिक्षण महर्षी होऊन गेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हा जिल्हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं हे होमग्राऊंड आहे. 

2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य

 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोंदिया विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 इतकी मतं मिळाली होती. तर भाजपाचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मतं मिळाली होते. काँग्रेसचे अमर वराडे यांनी 8 हजार 938 मतं मिळवली होती.  मोरगांव अर्जुनीमध्ये  2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपच्या राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता. आमगाव देवरी या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा पराभव केला होता. विधानसभेत 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात पराभव केला होता.

ही बातमी वाचा : 

Arjuni Morgaon Vidhan Sabha constituency: अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात चौरंगी लढत, कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
×
Embed widget