एक्स्प्लोर

Maharashtra Goverment: मोठी बातमी: अमित शाह प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, दिल्लीतील महायुतीच्या बैठकीची Inside Story!

Mahayuti Delhi Meeting Inside Story: अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक झाली होती.

Mahayuti Delhi Meeting Inside Stroy मुंबई: मुख्यमंत्री दरे गावातून परतल्यावर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार का असा सवाल आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले. मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही. 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्रि‍पदी कोण असणार याबाबत अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. याचदरम्यान दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी (Mahayuti Delhi Meeting Inside Story) एबीपी माझाच्या हाती आली आहे. 

अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक झाली होती. यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केलं होतं का?, याचा विचार देखील मंत्रिपद देताना विचारत घेतलं जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टकार्ड घेऊन दिल्लीत या-

मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल, तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं?, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता?, महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला?, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का?, या मुद्यांचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावलं आहे. आज महायुतीचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

संपूर्ण राज्याला उत्सुकता-

उपमुख्यमंत्री किती असणार कोण कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही. महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना ती लांबलेली आहे. सत्तास्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहे. त्याचसोबत महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादीने आपापले गटनेते जाहीर केलेत. मात्र अजूनही भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडलीय. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.

संबंधित बातमी:

Eknath Shinde: हातात कागदपत्रे, चेहऱ्यावर निराशा...; दरेगावातून निघताच आजीबाई समोर आल्या, एकनाथ शिंदेंनी लगेच गाडी थांबवली अन्...

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Budget Session: लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
Kolhapur Municipal Corporation: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
नागपुरात महिंद्राचा मोठा प्लांट, विदर्भात सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प; देवाभाऊंची घोषणा, सांगितलं मॅग्नेट हब
नागपुरात महिंद्राचा मोठा प्लांट, विदर्भात सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प; देवाभाऊंची घोषणा, सांगितलं मॅग्नेट हब

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Budget Session: लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
Kolhapur Municipal Corporation: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात 'जनसुराज्य'च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
नागपुरात महिंद्राचा मोठा प्लांट, विदर्भात सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प; देवाभाऊंची घोषणा, सांगितलं मॅग्नेट हब
नागपुरात महिंद्राचा मोठा प्लांट, विदर्भात सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प; देवाभाऊंची घोषणा, सांगितलं मॅग्नेट हब
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
Rajyasabha Member: राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
Embed widget