Election Results 2021: तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता, सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक आघाडीवर
Tamil Nadu Election Results: सुरवातीच्या कलामध्ये द्रमुक 132 जागांवर आघाडीवर असून अण्णा द्रमुक 101 जागांवर आघाडीवर आहे. तर मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हसन आघाडीवर आहेत.
चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता असून सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून 132 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर प्रतिस्पर्धी अण्णा द्रमुक 101 जागांवर आघाडीवर आहे. मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हसन आघाडीवर आहेत.
मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना काही दिवसांपूर्वीच झाली होती. त्याचे नेते कमल हसन यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून तामिळनाडू पिंजून काढला होता. सध्या ते त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर आहेत.
गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकने बहुमत मिळवले होते. 234 जागा असलेल्या विधानसभेत अण्णा द्रमुकने 136 जागा मिळवल्या होत्या तर विरोधी द्रमुक पक्षाला 89 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या.