(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, सुषमा अंधारेंचा दावा, भाजपमधील पर्यायी नावही सांगितलं!
Devendra Fadnavis : सरकारमधून मोकळं करण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे केली आहे.
Sushma Andhare On Devendra Fadnavis : सरकारमधून मोकळं करण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे केली आहे. पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं फडणवीस म्हणाले. पक्षासाठी काम करण्यासाठी सरकारमधून मोकळं होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त दाखवली. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून मोकळं करण्याच्या विनंतीवर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत -
देवेंद्र फडणवीस यांचं हे म्हणणं एकदम एक्झिट मागणं आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली त्यात खलबतं झाली. बावनकुळे यांना देखील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमध्ये नको आहेत. आपण स्वतःहून ते बाहेर पडत आहेत, ते बरं आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
जबाबदारीने मी हे बोलत आहे की फडणवीस कधीही विधानसभेला मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. भाजप आता त्यांना एक चेहरा म्हणून वापरणार नाही. एकवेळ विनोद तावडे यांना संधी दिली जाईल पण फडणवीस यांना नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
मी काल म्हणाले होते लोकांना वाटलं की मी उत्साहाच्या भरात बोलले. पण मी आज पुन्हा एकदा सांगते देवेंद्र फडणवीस यापुढे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजपाचे नेतृत्व आता कधीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार नाहीत, असे अंधारे म्हणाल्या.
आशिष शेलार यांना अती आत्मविश्वास होता. ते सन्यास घेणार होते. त्यांनी मला तारीख सांगावी, असा टोलाही अंधारे यांनी सांगितले.
सुनील तटकरे काय म्हणाले ?
देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर भाजपने यश संपादन केलं होतं. ते मुख्यमंत्री देखील झाले. त्यामुळं जे अपयश आलं त्यामुळे ते व्यतीत झाले असतील. त्यामुळे ते बोलले असावेत. त्यांनी नैतिकता लक्षात घेत बाजूला होण्याबाबत ते बोलले असतील, असे सुनील तटकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आज सर्वात प्रमुख नेते आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धूरा सांभाळली आहे. ॲाक्टोबरमध्ये होणा-या निवडणूकामुळे त्यांनी म्हटलं असेल. भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे देवेंद्र जी यांनी नैतिकतेनं जबाबदारी सांभाळून बोलले असतील, असे सुनील तटकरे म्हणाले.
अमोल मिटकरी यांचे वक्तव्य बारामती पुरते मर्यादीत असावे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती आणि मतदारसंघातील आढावा घेतला जाईल.
बहुमत सिद्ध करण्यासाठी 272 ची आवश्यकता असते… 240 आकडे असलेले सरकार स्थापन करू शकत नाही. महायुतीने सगळीकडे काम व्यवस्थित आहे. मध्यंतरी राज्यभरातील घडामोडी झाल्या त्या भावना लोकांच्या मनात होत्या. आम्ही प्रत्येक विधानसभा निहाय आढावा घेणार आहोत, असे तटकरे म्हणाले.
आणखी वाचा :
मोठी बातमी : मला उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करा, देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्त्वाला विनंती