एक्स्प्लोर
'फन टाईम विथ फॅमिली', सुप्रिया सुळेंकडून पार्थ-रोहितसोबतचा फोटो शेअर
या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र दिसत आहेत. मात्र नाराजीच्या चर्चांनंतर पवार कुटुंबीयात सर्व काही आलबेल असल्याचं या फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन रोहित पवार नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. पवार कुटुंबीयांमधील नाराजी पहिल्यांदाच समोर आल्याचं म्हटलं जात होतं. पण त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीय सुळे यांनी एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. "फन टाईम विथ फॅमिली" असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.
या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र दिसत आहेत. मात्र नाराजीच्या चर्चांनंतर पवार कुटुंबीयात सर्व काही आलबेल असल्याचं या फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी मिळावी यासाठी माढ्यातून माघार घेतली. मात्र यानंतर रोहित पवार यांनी शरद पवारांना उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे पार्थ आणि रोहित पवार यांच्यात धुसफूस असल्याची चर्चा रंगली होती. मात्र रोहित पवार यांनी या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं होतं.
मात्र सुप्रिया सुळे यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. केवळ सुप्रिया सुळेच नाही तर रोहित पवार यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिघांचा सेल्फी पोस्ट करुन, भाऊ पार्थ पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवार यादीत पार्थ पवार यांना मावळमधून तिकीट देण्यात आलं. यानंतर रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करुन पार्थ यांना उमेदवारी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करत, ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
