एक्स्प्लोर
Advertisement
नेत्याच्या पार्थिवाला हार घालताना फोटोसेशन, सुजय विखे पाटील ट्रोल
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गाडे यांना श्रद्धांजली वाहताना सुजय विखेंनी केलेल्या फोटोसेशनवरुन एकच खळबळ उडाली आहे. हार घालताना फोटो काढल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरले आहेत.
अहमदनगर : अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी गाडे यांचं काल पहाटे निधन झालं. मात्र अहमदनगरमधील भाजप उमेदवार सुजय विखे यांनी गाडेंच्या पार्थिवाला हार घालताना केलेलं फोटोसेशन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.
शिवाजी गाडे हे नगर दक्षिणचे आघडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारात व्यस्त होते. काल पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं अकस्मात निधन झालं. मूळगाव बारागाव नांदूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुजय विखेंनी सकाळी सात वाजताच्या सुमारास गाडे यांच्या निवासस्थानी भेट देत श्रद्धांजली वाहिली.
श्रद्धांजली वाहताना विखेंनी केलेल्या फोटोसेशनवरुन एकच खळबळ उडाली आहे. हार घालताना फोटो काढल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरले आहेत.
VIDEO | सुजय विखेंचा नेत्याच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करतानाचा फोटो वायरल
दुसरीकडे, विखे समर्थकही आक्रमक झाले आहेत. संग्राम जगताप यांच्यासाठी प्रचारात फिरणाऱ्या नेत्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जगताप अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत आनंद साजरा करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल केले जात आहेत.
सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली. त्यामुळे अहमदनगरची लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement