एक्स्प्लोर

Madha : माढ्यामध्ये मोहिते विरुद्ध रणजित निंबाळकर संघर्ष देवेंद्र फडणवीसांच्या समोर उघड होणार, भाजपच्या अंतर्गत लाथाळीत जागा धोक्यात

Madha Loksabha Election : माढा लोकसभा मंतदारसंघातील खासदार रणजित निंबाळकर विरूद्ध मोहिते पाटील गटामध्ये वाद वाढत चालला असून येत्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. 

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघ तसा भाजपासाठी सर्वात सुरक्षित असा मतदारसंघ असताना आता मोहिते-पाटील विरुद्ध भाजप खासदार रणजित निंबाळकर यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा समोर आला आहे. या दोघांतील संघर्ष आणि भाजपमधील नाराजीनाट्य आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घडण्याची शक्यता आहे. यासाठी मुहूर्त आहे तो मोहिते पाटील यांच्या शंकर सहकारी साखर कारखाना विस्तारीकरण कामाच्या भूमीपूजन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याचा. 

गुरुवारी 7 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होत होणार होता. पण राज्यातील परिस्थितीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पण नंतर होणाऱ्या कार्यक्रमासाठी तब्बल 64 मान्यवरांना निमंत्रण दिले आहे. यातून भाजप खासदार रणजित निंबाळकर यांचे नाव वगळण्यात आल्याने पुन्हा एकदा मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील संघर्ष उघड झालेला आहे. 
      
माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर 2014 साली येथून विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते. यानंतर मात्र 2019 मध्ये मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने माढ्यातून भाजपचे रणजित निंबाळकर लाखभर मताच्या फरकाने विजयी झाले. सुरुवातीला मोहिते आणि निंबाळकर यांच्यात मधूर संबंध होते. मात्र अलीकडच्या दोन वर्षात निंबाळकर आणि मोहिते यांच्यात वाद सुरु झाल्याने दोन्ही नेते एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करू लागले होते. 

माढा लोकसभेसाठी 2024 साठी मोहिते पाटील याना उमेदवारी हवी अशी मागणी त्यांच्या समर्थकांतून होत असताना निंबाळकर हे मतदारसंघात आपली ताकद वाढवू लागले आहेत. यातच अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर गेल्यावेळी निंबाळकर यांच्याकडून पराभूत झालेले करमाळ्याचे आमदार संजयामामा शिंदे यांनी निंबाळकर याना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणा केली होती. त्यासोबत माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांनीही रणजित निंबाळकर याना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची भूमिका घेतल्याने मोहिते पाटील गट अस्वस्थ बनला आहे. 

शंकर कारखान्याच्या विस्तारीकरण कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांचे स्थानिक विरोधक रामराजे निंबाळकर यांच्यासह जवळपास 64 आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. मात्र यातून खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांना साथ देणारे माढा आमदार बबनदादा शिंदे, करमाळा आमदार संजयामामा शिंदे याना मात्र वगळले आहे. 
      
सध्या इंडिया आघाडीकडे माढा लोकसभेसाठी उमेदवारच नसल्याने विरोधकांकडून उमेदवारीचा शोध सुरु झाला आहे. त्यामुळेच काँग्रेसने माढा लोकसभेवर दावा करत जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव पुढे केले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून राज्याचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके हे धनगर आणि ओबीसी मतांच्या जोरावर माढा लोकसभेवर दावा करण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार यांनी शेकाप मधील बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

अशावेळी सर्वात मजबूत दावा हा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांचा असून अजितदादा सत्तेत आल्याने भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे. अशात आता भाजपमध्ये मोहिते पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्यातील संघर्ष तातडीने न मिटल्यास भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. आता गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ही गटबाजी येणार असल्याने फडणवीस माढ्यातील जागा राखण्यासाठी कोणता कानमंत्र देणार यावर माढ्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget