एक्स्प्लोर
Advertisement
राणेंसोबत शिवसेना सोडून मूर्खपणा, माजी आमदाराची खंत, राणेंनी राजकीय अस्तित्व संपवल्याचाही आरोप
नारायण राणेंनी 21 आमदार फोडले. त्यात मी एक होतो, तोच माझा मूर्खपणा' अशी खंत सिंधुदुर्गातील माजी आमदार शंकर कांबळी यांनी बोलून दाखवली.
सिंधुदुर्ग : तळकोकणात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागताच राजकीय शिमग्याला सुरुवात झाली आहे. माझं राजकीय अस्तित्व नारायण राणे यांनी संपवलं, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार आणि कोणे एके काळी कट्टर राणे समर्थक असलेल्या शंकर कांबळी यांनी केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना सर्वोच्च मुख्यमंत्रिपद दिलं. मात्र त्यांच्याशी गद्दारी करत राणे सेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसवासी झाले. परंतु त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा सर्वांवरच टीका केली, असं कांबळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात युतीच्या प्रचार सभेत म्हणाले.
'आपण स्वाभिमानी पक्ष स्थापन करुन या पक्षात जिथे दोघे मुलगे नेतील तिथे नारायण राणे जातात. आज जी चूक मी केली, ती कोणीही करु नये. राणे सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याच मालकीचा असल्याच्या आविर्भावाने वावरतात. मी मूर्खपणा केला नारायण राणेंना साथ देऊन. त्यांना वाटायला लागलं खरी शिवसेनेची ताकद मीच. मी पक्ष हाताळणार. त्यावेळी राणेंचे मनसुबे उधळून लावले. तरीही राणेंनी 21 आमदार फोडले. त्या 21 आमदारात मी एक होतो, तोच माझा मूर्खपणा' अशी खंत शंकर कांबळी यांनी बोलून दाखवली.
VIDEO | खासदार नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा | माईक टेस्टिंग
'ज्या शिवसेनेने मला तीन वेळा आमदार केलं, त्या शिवसेनेला दूर करुन मी मूर्खपणा केला. त्याचा परिणाम मला भोगावा लागला. कुणाच्या मानगुटीवर कसा पाय द्यायचा, हे तेच जाणतात. राणेंचा त्यावेळचा मित्र परिवार, सोबती बाजूला झाले ते राणेंच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या दोन चिरंजीवांमुळे' असा घणाघातही कांबळींनी केला.
'बाळासाहेबांना निलेश राणे शिव्या देतात, मात्र बाळासाहेबांच्या वहाणेजवळही उभं राहायची त्याची लायकी नाही' अशी टीकाही यावेळी शंकर कांबळी यांनी केली. राणेंसोबत गेलेल्या लोकांचा कपाळमोक्ष होतो, असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
मुंबई
निवडणूक
Advertisement