एक्स्प्लोर

Shrinivas Vanga  : पालघरमध्ये दिलजमाई! तिकीट नाकारल्यानंतर ओक्साबोक्सी रडणारे श्रीनिवास वनगा मुख्यमंत्र्यांसोबत, भर स्टेजवरून एकनाथ शिंदेंचा मोठा शब्द

Shrinivas Vanga  : पालघरमध्ये शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांना तिकीट नाकारून ते राजेंद्र गावित यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा नाराज होते. 

पालघर : विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर ओक्साबोक्सी रडणारे शिंदे गटाचे मावळते आमदार श्रीनिवास वनगा यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं दिसतंय. श्रीनिवास वनगा हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत दिसून आले असून महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासोबत ते स्टेजवरही दिसले. श्रीनिवासचं चांगले होईल, त्याला इकडे तिकडे पाहायची गरज नाही असा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यानी दिला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करणारे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी एकनाथ शिंदे यांचे पालघरच्या हेलिपॅडवर स्वागत केले. त्यानंतर महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली. त्यावेळी स्टेजवर श्रीनिवास वनगा उपस्थित होते. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याच्या चर्चा आहे.

इतके तिकडे पाहायची गरज नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी लोकसभेमध्ये काहींना उमेदवारी देऊ शकलो नाही. परंतु त्यांना विधानसभेत ताबडतोब उमेदवारी दिली. आम्ही उठाव केला तेव्हा श्रीनिवास माझ्यासोबत होता. आताही श्रीनिवासच्या घरचा कार्यक्रम होता. तो बाजूला ठेवून याच मार्गाने तो आमच्या सोबत आला.श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहे. श्रीनिवासचं चांगलं होईल, त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज नाही. 

श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापलं

एकनाथ शिंदे जून 2022 ला सूरतला जाताना  ज्या श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण दाखवून पालघरच्या दिशेनं गेले होते त्याच श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. शिंदेंसोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी 39 आमदारांना पु्न्हा संधी देण्यात आली. पण फक्त श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्या ठिकाणी भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज होते. त्यांचा ओक्साबोक्सी रडतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा हे चार दिवस गायब झाले होते. ते आत्महत्या करण्याच्या विचारात होते असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं होतं. चार दिवसानंतर वनगा हे घरी परतले.  

उद्धव साहेब आमच्यासाठी देव होते. शिदेंसाहेंबावर विश्वास ठेवला ही आमची चूक झाली. 39 आमदारांचं पुनर्वसन केलं, माझ्या पतीचं  काय चुकलं असा सवाल श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी विचारला होता.

तिकीट वाटपावेळी झालेल्या नाराजीनाट्यानंतर आता श्रीनिवास वनगा पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे. 

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget