एक्स्प्लोर
'शिवसेनेकडून पक्षात येण्यासाठी आतापर्यंत 25 फोन', विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
चंद्रपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'मला शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत आहेत', असा दावा त्यांनी केला आहे.
चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाने माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना आपल्या गळाला लावून मोठा राजकीय भूकंप घडवला होता. मात्र शिवसेनेकडून देखील आता तसेच प्रयत्न सुरु असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षात घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा खुद्द वडेट्टीवार यांनीच केला आहे. 'मला बांद्र्यावरून आतापर्यंत 25 फोन आले आहेत', असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
चंद्रपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'मला शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत आहेत', असा दावा त्यांनी केला आहे. 'मला काही दिवसांपासून 'वर्षा'वरुन आणि बांद्र्यावरुन फोन येत आहेत. बांंद्र्यावरुन येणारे फोन जास्त आहेत. मला बांद्र्यावरून आतापर्यंत 25 फोन आले आहेत आणि भेटायला बोलावत आहेत. एक विरोधी पक्षनेता भाजप मध्ये गेला म्हणून दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेला त्यांच्या पक्षात न्यायचा आहे', असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटलांनीही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गेल्या महिन्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मोठ्या नेत्यांनी, आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. विरोधी पक्षातील आणखी बरेच लोक भाजप मध्ये येण्यास तयार असल्याचा दावाही भाजप नेत्यांकडून केला जात आहे. अशावेळी शिवसनेकडून थेट विरोधी पक्षनेत्यालाच पक्षात घेण्यासाठी तयारी सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा आज लातूरमध्ये, उदगीरला जाताना शेतकऱ्यांसोबत पेरणीचा अनुभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
व्यापार-उद्योग
क्राईम
शिक्षण
Advertisement