बिहार निवडणुकीचा कौल हाती येताच संजय राऊतांची निवडणूक आयोग अन् भाजपवर आगपाखड; म्हणाले, एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
Sanjay Raut : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

Bihar Election Result 2025 Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून देशाचे लक्ष वेधून ठेवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) कल येण्यास सुरुवात झाली आहे. निकालाअंती आज (शुक्रवारी) 243 जागांचे निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार भाजप (BJP) आणि जडीयूच्या(JDU) एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे. अशातच या विजयाच्या दिशेने होणारी वाटचाल देशभरात भाजप (BJP) आणि जडीयूच्या, एनडीएच्या गोटात जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत महागठबंधंनला अपेक्षित असे यश मिळत नसल्याचे चित्र आहे. एकंदरीत या निकालावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut: .....यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने (Bihar Election Result 2025) धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग (Election Commission of India) आणि बीजेपी (BJP) यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न!, अशा शब्दात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका केली आहे. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50 च्या आत संपवले! असेही संजय राऊत म्हणाले.
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2025
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!
Ambadas Danve: काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या
दुसरीकडे याच निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही काँग्रेसवर घणाघात केलाय. अंबादास दानवे म्हणाले की, पराभव झालेला आहे हे मान्य. मात्र भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
आणखी वाचा




















