एक्स्प्लोर

Shivaji Patil : जिंकल्यानंतर औक्षण करायला गेला अन् गुलालामुळे निरांजनातील वातीचा भडका उडाला; आमदार शिवाजी पाटील भाजल्याने जखमी

Shivaji Patil : जेसीबीच्या माध्यमातून शिवाजी पाटील यांच्या अंगावर गुलाल टाकला जात होता. त्याचवेळी आगीचा भडका उडाला. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले आहेत.

Chandgad Kolhapur : कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) थोडक्यात बचावले आहेत. शिवाजी पाटील यांचा विजय घोषीत झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर त्यांचं काही महिला औक्षण करत असताना त्यांच्या अंगावर गुलाल पडल्याने आगीचा भडका उडाला. आगीच्या भडक्यात आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांच्यासहीत औक्षण करणाऱ्या काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. काल (शनिवारी) विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास विजयी मिरवणुकीच्या वेळी शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

चंदगड विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील  (Shivaji Patil) यांच्या विजयी मिरवणुकी वेळी महिला औक्षण करत असताना जेसीबीच्या माध्यमातून शिवाजी पाटील यांच्या अंगावर गुलाल टाकला जात होता. त्याचवेळी आगीचा भडका उडाला. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमध्ये काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काल (शनिवारी) विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आला त्यानंतर राज्यभरात विजयी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील  (Shivaji Patil) विजयी झाले आहेत. यावेळी कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते. त्यावेळी महिलांनी शिवाजी पाटील यांचं औक्षण करण्यासाठी पुढे आल्या त्याचवेळी त्यांच्या अंगावर जेसीबीने गुलाल टाकण्यात आला. गुलाल आणि आग यांचा संपर्क आल्याने एकदम भडका उडाला. या घटनेमध्ये तीन ते चार महिला जखमी झाल्या आहेत. शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांना देखील काही प्रमाणात भाजलेले आहे. त्यांच्यावर देखील उपचार करण्यात आलेले आहेत. नवनिर्वाचित आमदार औक्षण करताना जखमी झाल्याचं सर्वत्र बोलले जाते. या घटनेचा व्हिडिओ देखील (Video) समोर आला आहे.

चंदगडमधून अपक्ष उमेदवाराचा गुलाल
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे (NCP) राजेश नरसिंगराव पाटील, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे कुपेकर-बाभुळकर नंदाताई हे रिंगणात होते, तर अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.  शिवाजी पाटलांनी 24 हजार 134 इतक्या मताधिक्याने बाजी मारली.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
Embed widget