विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपची बैठक
सध्या राज्यभरात शिवसेना भाजप युतीची घोषणा कधी होणार, याची चर्चा सुरु आहे. मात्र पितृपक्षामुळे युतीच घोषणा रखडली असल्याची चर्चा आहे.
![विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपची बैठक Shiv Sena-BJP alliance likely to announce today, BJP meeting in Delhi in presence of Modi विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपची बैठक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/08085544/Shivsena-BJP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नवी दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतील तिकीट वाटपावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजय पुराणिक, व्ही. सतीश हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. भाजपच्या या बैठकीकडं संपूर्ण राज्यासह शिवसेनेचंही लक्ष लागलं आहे. पितृपक्ष संपल्यानंतर भाजप-शिवसेनेची युती होणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे युतीचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सध्या राज्यभरात शिवसेना भाजप युतीची घोषणा कधी होणार, याची चर्चा सुरु आहे. मात्र पितृपक्षामुळे युतीच घोषणा रखडली असल्याची चर्चा आहे. राज्यात शिवसेना भाजपची युती होणार हे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं जातंय, मात्र अद्याप जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला समोर आलेला आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याची बोललं जातंय, मात्र युती होणार हे दोन्ही पक्षांचे नेते ठामपणे सांगत आहेत.
केंद्रात मोदी व भाजपची वाढलेली ताकद, विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांचं झालेलं इनकमिंग आणि 2014 मधला भाजपचा महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट पाहता भाजप 50-50 वर कधीच तयार होणार नाही असं दिसतंय. त्यातूनच सध्या भाजप-सेनेदरम्यान जागापाटपाचे अनेक फॉर्म्युले पुढे येतायत.
फॉर्म्युला 1
भाजप- 135
शिवसेना- 135
मित्रपक्ष- 18
----------------------------
फॉर्म्युला 2
भाजप- 171
शिवसेना- 117
मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून
--------------------------------
फॉर्म्युला 3
भाजप- 162
शिवसेना- 126
मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून
------------------------------------
फॉर्म्युला 4
भाजप- 150
शिवसेना-120
मित्रपक्ष- 18
-------------------------------------
फॉर्म्युला 5
भाजप- 145
शिवसेना-125
मित्रपक्ष- 18
संबंधित बातम्या
- शिवसेनाप्रमुखांना वचन दिलंय, शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन : उद्धव ठाकरे
- भाजपाध्यक्ष अमित शाह 26 तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर, दोन दिवसात युतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता
- लोकसभेत युतीसाठी मातोश्रीची पायरी चढणारे अमित शाह आगामी विधानसभेत युतीच्या चर्चेत मध्यस्थी करणार का?
- भाजपाध्यक्ष अमित शाह 26 तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर, दोन दिवसात युतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता
- युतीचा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरला आहे : उद्धव ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)