प्रकाश आंबेडकरांना एकही जागा मिळते का ते पाहू अन्..., शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते स्पष्टच बोलले
आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, आम्हाला पूर्ण विश्वास आहे आम्ही 26 तारखेला आमचे सरकार स्थापन करू. असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
मुंबई: संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पक्षाकडून विशेष खबरदारी घेत इतर हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल (Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे विधानसभा निकालापूर्वी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedka) मोठं वक्तव्य केलं आहे. "जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे", असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाष्य करत प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे. आधी प्रकाश आंबेडकरांना एकही जागा मिळते का ते पाहू आणि मग निर्णय घेऊ. असे महेश तपासे (Mahesh Tapase) म्हणाले.
आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा- महेश तपासे
लहान पक्ष आमच्यासोबत आहेत आणि जे घाबरले होते तेही उद्यानंतर आमच्यासोबत येतील. आमच्या विचाराशी सहमत असलेल्या इतर पक्षांसोबत आम्ही पुढे जाऊ. आम्ही उमेदवारांना मतमोजणी केंद्रावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, दिल्लीतून फोन आल्यास आम्ही तिथेही उपस्थित राहू. अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली. तर आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, आम्ही सरकार कसे बनवायचे यावर चर्चा करत होतो. आम्हाला पूर्ण विश्वास आहे.कारण हे सत्ताविरोधी मतदान आहे, आम्ही 26 तारखेला आमचे सरकार स्थापन करू.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोठं वक्तव्य केलं आहे. "जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे", असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे. तर राज्यात महायुती की महाविकास आघाडी? नेमकं कोण सत्ता स्थापन करणार? याचे चित्र शनिवारी स्पष्ट होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या