Sharad Pawar: माढ्यामधून निवडणूक लढवणार की नाही? शरद पवारांचा मोठा निर्णय
शरद पवारांनी आगामी निवडणुकांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे सांगत शरद पवारांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Election) निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी कार्यकर्ते करत आहे. त्यानंतर शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.मात्र शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.दिंडोरी लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवारांनी आगामी निवडणुकांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे सांगत शरद पवारांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
शरद पवारांनी राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये माढ्याचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांनीच या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी अशी मागणी केली. शरद पवारांनी 2009 साली बारामती (Baramati Lok sabha Election) सोडून माढा या मतदारसंघाताला पसंती दिली होती आणि त्या ठिकाणाहून निवडूनही आले होते. त्यानंतर शरद पवार माढ्यातून नवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आज डोरी लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवारांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्टच सांगितले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करुन संघटना मजबूत करण्यावर शरद पवारांनी भर देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काही महिने राहिले असताना पवार यांनी पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेत मतदारसंघनिहाय आढावा घेतला.
राज्यासह देशाचा दौरा करणार
शरद पवार म्हणाले, मी आगामी लोकसभा लढवणार नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरे करुन संघटना मजबूत करण्यावर भर असणार आहे. पक्ष बळकट करण्यासाठी राज्यासह देशाचा दौरा करणार आहे. तसेच विरोधरांच्या इंडिया आघाडीत समन्वयासाठी प्रामुख्याने भूमिका पार पाडणार आहे. शरद पवारांनी राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये माढ्याचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांनीच या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी अशी मागणी केली.