Sharad Pawar: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शरद पवारांनी फोन फिरवला; बंडखोरांना थेट सूचना दिल्या, कुणाला फोन केले?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शरद पवारांनी फोन करत बंडखोर उमेदवारांना सूचना दिल्या आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी फोन करत बंडोखोर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बंडखोर उमेदवार देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे. शरद पवारांनी फोन करत बंडखोर उमेदवारांना सूचना दिल्या.
शरद पवारांनी कुणाला फोन केले?
1) पिंपरी- दीपक रोकडे
2) श्रीवर्धन- ज्ञानदेव पवार
3) अहेरी- संदीप कोरट
4) संदीप बजोरिया - यवतमाळ
5) पर्वती विधानसभा- बाबा धुमाळ
6) परंडा - रणजीत पाटील (ठाकरेंची शिवसेना)
मी माघार घेतलेली नाही- रणजीत पाटील
परंडा विधानसभा मतदारसंघात (Bhum Paranda Vidhan Sabha) महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ठाकरे गटाचे रणजीत पाटील (Ranjit Patil) आणि शरद पवार गटाकडून राहुल मोटे (Rahul Mote) यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर आज रणजीत पाटील हे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र मी माघार घेतलेली नाहीय, असं रणजीत पाटील यांनी म्हटलं आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातून मी माघार घेतलेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नका,असं रणजीत पाटील यांनी सांगितले. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, पक्षाकडून अध्याप कोणतही बोलणं झालेलं नाही. परंडा विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज कायम आहे, असं म्हणत उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेटाळली आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघात पुन्हा शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत मैदानात-
विद्यामान मंत्री तानाजी सावंत यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना त्यांना ज्ञानेश्वर पाटलांचा सपोर्ट होता. गेल्या अडीच वर्षात मतदारसंघात वाढवलेला जनसंपर्क, विकास कामे ही तानाजी सावंत यांच्या जमेच्या बाजू आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मेटे यांचा देखील मतदारसंघात अनेक वर्षांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांना देखील या निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे.