एक्स्प्लोर

गांधी घराण्याला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही काय दिवे लावले सांगा? पवारांचा मोदींवर निशाणा

गांधी घराण्याची पुढची पिढी कधीच जबाबदारी झटकत नाही. मात्र मोदी त्यांना विचारतात तुम्ही काय केलं? पण पहिल्यांदा आपण काय दिवे लावले ते सांगा, अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींना जाब विचारला.

उल्हासनगर : ज्या घरात दोन हत्या होऊनही पुढची पिढी जबाबदारी झटकत नाही, त्या गांधी घराण्याला तुम्ही काय केलं म्हणून विचारता? पण तुम्ही काय दिवे ते पहिल्यांदा सांगा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. उल्हासनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत पवारांनी टीकास्त्र सोडलं. 'राजीव गांधी यांनी देशाला विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे नेलं. त्यामुळेच आज खेड्यापाड्यात महिलांच्या हातात मोबाईल दिसतो. गांधींच्या घरात इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी राजीव गांधी समोर आले. राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळी सोनिया गांधी पुढे आल्या. आता राहुल गांधींनी जबाबदारी घेतली आहे. गांधी घराण्याची पुढची पिढी कधीच जबाबदारी झटकत नाही. मात्र मोदी त्यांना विचारतात तुम्ही काय केलं? पण पहिल्यांदा आपण काय दिवे लावले ते सांगा. उगाचच इतरांवर आरोप करु नका' अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींना जाब विचारला.
शरदराव तुम्ही तिकडं शोभत नाहीत, पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका
दरम्यान, मोदी सैनिकी कारवायांचं श्रेय घेत असल्याच्या आरोपाचाही पवारांनी पुनरुच्चार केला. मोदी ठिकठिकाणी सांगतात दहशतवाद्यांचा बंदोबस्त मीच करतो, कारण माझी छाती 56 इंचाची आहे. अभिनंदनलाही आम्हीच परत आणल्याचा दावा भाजपवाले करतात. मात्र अडीच वर्षांपासून कुलभूषण जाधव पाकिस्तानकडे आहे. त्याला का नाही सोडवलं? आता कुठे गेली तुमची 56 इंचाची छाती? असा सवाल करत पवारांनी मोदींवर खरमरीत टीका केली. VIDEO | आता मोदींच्या हातात हात देत नाही, शरद पवारांचा मोदींना टोला | पुणे गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. नरेंद्र मोदींएवढी व्यक्तिगत टीका कुणी केली नाही, अशी खंत शरद पवारांनी 'विचारसंहिता' या विशेष कार्यक्रमात 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली होती.
मोदी इतरवेळी ठिक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं : शरद पवार
शरद पवारांचं बोट धरुन मी राजकारणात आलो, असं मोदी म्हणाले होते, मात्र तसं काही नाही, उगाच माझं बोट खराब करु नका, असा टोला शरद पवारांनी जळगावात लगावला होता. मोदी इतर वेळी ठीक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं, अशा शब्दात पवारांनी मोदींना कानपिचक्याही लगावल्या होत्या. तर, शरदराव तुम्ही फुटीरतावाद्यांसोबत शोभत नाहीत, असं म्हणत मोदींनी लातूरमधील सभेत शरद पवारांना टोला लगावला होता.
उगाच माझं बोट खराब करु नका, शरद पवारांचा मोदींना टोला
राष्ट्रवादीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरच्या गोल मैदानात ही सभा झाली. मात्र या सभेचा रिकाम्या खुर्च्यांमुळे फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. संबंधित बातम्या :
मोदींएवढी व्यक्तिगत टीका कुणी केली नाही, शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र
ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलतायत, शरद पवारांची मोदींवर टीका
राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहार तुरुंगात, गोंदियाच्या सभेत मोदींचा हल्लाबोल
मोदींनी पवार कुटुंबाऐवजी शेतकरी, बेरोजगारांची काळजी करावी : अजित पवार
अजित पवार उत्तम प्रशासक, मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करु नये : शरद पवार
राष्ट्रवादीत गृहयुद्ध, पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत : पंतप्रधान मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget