एक्स्प्लोर

Saoner Vidhan Sabha Constituency : 25 वर्षानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त करत भाजपचा विजयी झेंडा; आशिष देशमुख ठरले सावनेरचे शिलेदार  

Saoner Vidhan Sabha Constituency : राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूरातील 12 मतदारसंघासह सावनेर विधानसभा मतदारसंघात भाजपने बाजी मारत दणदणीत विजय मिळवला आहे.

Saoner Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. दरम्यान, सावनेर विधानसभा मतदारसंघात (Saoner Vidhan Sabha Election)  पाच टर्म प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी तथा काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे आशिष देशमुखयांनी त्यांचा 26, 401 मतांनी पराभव केला. निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 18 पैकी दोन वगळता अन्य उमेदवारांना अत्यल्प मतांवर समाधान मानावे लागले आहे.

एकूण 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मतदारांनी आशिष देशमुख यांच्या झोळीत 1 लाख 19 हजार 725 मते टाकली, तर अनुजा केदार यांना 93,324 मते मिळाली. देशमुख आणि केदार यांच्यात सरळ लढत झाली. मतमोजणीत देशमुख यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम होती. एका फेरीत केदार यांनी आघाडी घेतली होती. परिणामी या ठिकाणी भाजपचे डॉ. आशिष देशमुख यांनी केदार यांचा बालेकिल्ला उध्वस्त करत भाजपाचा विजयी झेंडा रोवला आहे. 

आशिष देशमुख (विजयी)

मिळालेली मते - 1,19,725
मतदान - 53.60%

अनुजा केदार (काँग्रेस)- पराभूत

मिळालेली मते- 93,324
मतदान - 41.78%

नोटा- 633 

सावनेर मतदारसंघात भाजपची हवा 

अशातच राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूरातील 12 मतदारसंघासह सावनेर विधानसभा मतदारसंघात (Saoner Assembly Constituency) यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. कारण २०१४ मध्ये देशमुख काका-पुतण्याच्या लढाईने काटोलची निवडणूक राज्यभरात गाजली. आता भाजपचे डॉ. आशिष देशमुख, त्यांचे सख्खे भाऊ डॉ. अमोल देशमुख आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा यांच्या लढतीने सावनेर मतदारसंघाची (Saoner Vidhan Sabha Election 2024) निवडणूक चर्चेत होती. देशमुख भावंडे आपसात लढत असले तरी सावनेरमध्ये खरा मुकाबला हा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा होताना दिसला आहे. मात्र या लढतीत भाजपने विजय मिळवला आहे.  

लाडक्या वहिनीविरुद्ध लाडक्या बहिणींवर मदार

जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांना यावेळी सावनेरमध्ये निवडणूक लढविण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांच्या पत्नी अनुजा यांना काँग्रेसने संधी दिली आहे. केदार यांच्या सावनेरमधील प्रस्थाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा 'लाडका भाऊ' असलेले डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्यावर विश्वास टाकला आहे. अनुजा या नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर यांच्या कन्या तर सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या सून आहे. आशिष आणि अमोल देशमुख हे काँग्रेसचे विदर्भातील दिग्गज नेते रणजित देशमुख यांचे चिंरजीव आहेत. सावनेर मतदारसंघ, केदार आणि देशमुख कुटुंब या मागे विविध राजकीय कंगोरेही आहेत. त्यामुळे यावेळी सावनेरची निवडणूक अधिक हायव्होल्टेज होत आहे. २००९ मध्ये आशिष देशमुख यांनी केदार यांना घाम फोडला होता. अवघ्या ३,४७२ मतांनी देशमुख यांचा पराभव झाला होता. यावेळी भाजपच्या मजबूत संघटेनसह पुन्हा एकदा देशमुख यांनी केदार यांना पहिल्याच दिवसांपासून कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखल्याने सावनेरचा मामला टफ झाला आहे. येथे १९ उमेदवार रिंगणात आहेत. यात 'बसपा'ने ताराबाई गौरकर, 'वंचित'ने अजय सहारे तर 'मनसे'ने धनश्याम निघाडे यांना संधी दिली आहे.

2019 मध्ये काय घडले?

सुनील केदार काँग्रेस - १,१३,१८४(विजयी)

डॉ. राजीव पोद्दार (भाजप) ८६,८९३

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्राडीमंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्राडीमंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attackerसैफवरील हल्ल्यानंतर CCTV मध्ये दिसणारा माझा मुलगा नाही,आरोपीच्या वडिलांचा दावाUday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहितीRaj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्राडीमंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्राडीमंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Embed widget