(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut: सांगलीत मैत्रीपूर्ण लढत, की सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती? संजय राऊतांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील एकमेकांसमोर उभे आहेत. मग तो सांगली पॅटर्न कुणाच्या बाजीने असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगली बाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीचा सांगलीचे उदाहरण आहे, मात्र हा दाखला होऊ शकत नाही. अपक्ष का प्रथमच जिंकत आहेत का? देशात याआधी देखील अपक्ष जिंकले आहेत. सांगली पॅटर्न (Sangli pattern) हा महाराष्ट्राचा लोकप्रिय नाही. खरं म्हणजे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) काम सर्वांनी केलं असतं तर निश्चितपणे शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार तिकडून निवडून आला असता. आमच्या मित्र पक्षांनी आघाडीचा धर्म पाळला नाही, विशिष्ट करणं असतील त्यामुळे सांगलीत अपक्ष निवडून आले. सांगलीमध्ये सर्वत्र काँग्रेस पक्षात सुद्धा बंडखोर या झालेल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील एकमेकांसमोर उभे आहेत. मग तो सांगली पॅटर्न कुणाच्या बाजीने असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली बाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मिरजची जागा शिवसेनेला सुटलेली आहे. असे ही संजय राऊत म्हणाले.
आमची बेरीज चुकणार नाही- संजय राऊत
बेरीज पूर्ण होईल, आमची बेरीज चुकणार नाही. आमच्या 96 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. काँग्रेसने पण आमच्यापेक्षा दोन-तीन जागा जास्त भरलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील चांगले अर्ज भरले आहेत. आम्हाला एकत्र बसून लढायचे आणि जिंकाचे आहे. त्यानुसार आम्ही योग्य तो मार्ग काढू, अशी माहिती ही संजय राऊत यांनी दिली.
90% जागांवर आम्ही तिन्ही पक्षांची समजूत काढलीय- संजय राऊत
कोणत्याही अलायन्समध्ये अशा घटना घडत असतात. निवडणूक अर्ज मागे घेण्याची तीन तारीख आहे. दरम्यान, या तारखेच्या आधी आम्ही एकत्र बसू आमच्या प्रत्येक घटकाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांची आम्ही समजूत काढू. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. 288 जागा अलायन्समध्ये कोणालाच लढता येत नाही. 90% जागांवर आम्ही तिन्ही पक्षांची समजूत काढलेली आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक, बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न : पटोले
दरम्यान, याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मतदार संघात दोन उमेदवार व बंडखोरीच्या मुद्यावरुन आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती पटोले यांनी दिली. बंडखोरांना शांत करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले. चर्चेतून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुनील केदारांनी बंडखोर उभे केले आहेत, त्याची तक्रार झाली आहे. भूपेश बघेल आपला अहवाल पाठवणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
हे ही वाचा