एक्स्प्लोर
बहीण प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी मुन्नाभाई संजय दत्त मैदानात
उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार आणि माजी खासदार प्रिया दत्त यांचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हादेखील मैदानात उतरला आहे.
मुंबई : उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार आणि माजी खासदार प्रिया दत्त यांचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हादेखील मैदानात उतरला आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या रोड शोमध्ये आज संजय दत्त सहभागी झाला होता. सांताक्रुझपासून या रोड शोला सुरुवात झाली. यावेळी लाडक्या संजू बाबाला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.
संजय दत्त सहभागी झालेल्या रोड शोसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी संजय दत्तचे चाहते संजू बाबा-संजू बाबा असं ओरडून संजय दत्तचे लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी संजय दत्तसोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.
प्रिया दत्त यांची यंदा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याशी टक्कर होणार आहे. 2009 मध्ये प्रिया दत्त या मतदार सघातून खासदार झाल्या होत्या. 2014 साली त्या पुन्हा एकदा या मतदार संघातून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. परंतु 2014 साली मोदी लाटेमध्ये दत्त यांचा पराभव झाला. त्यांच्याऐवजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पूनम महाजन या मतदार संघातून निवडून आल्या. महाजन यांना 4 लाख 78 हजार 535 मत मिळाली होती, तर प्रिया दत्त यांना 2 लाख 91 हजार मतं मिळाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement