एक्स्प्लोर

Amit Thackeray vs Sada Sarvankar: सदा सरवणकर नरेंद्र मोदींना भेटले; मुंबईतील शिवजी पार्कवरील सभेत नेमकं काय घडलं?, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काल मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली.

Sada Sarvankar Narendra Modi मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Vidhan Sabha) तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. 

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार मंचावर उपस्थित होते. माहीम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) देखील मंचावर होते. नरेंद्र मोदी महायुतीच्या या सर्व उमेदवारांची भेट घेत होते. यावेळी सदा सरवणकरांची देखील नरेंद्र मोदींनी भेट घेतली. नरेंद्र मोदी समोर येताच सदा सरवणकरांनी त्यांना नमस्कार करत पाया पडले. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत- नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील निवडणुकीतील आजची माझी शेवटची सभा आहे. मी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. आज मी आमच्या मुंबईत आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे.  आज एकच आवाज आहे, भाजप महायुती आहे तर गती आहे, तरच महाराष्ट्राची प्रगती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. महायुती स्वप्नांना पूर्ण करणारे बंधन आहे. मध्यमवर्ग ज्याने दशकांपासून स्वप्न नाही बघितले त्याचे स्वप्न पूर्ण होत आहेत.  आम्ही स्टार्टअप इंडिया सुरु केला, मुंबईत मोठ्या प्रमाणात स्टार्टअप येतायत. 70 लाख रेडीपटरीवाल्यांना आपला व्यापार वाढायला मदत मिळाली आहे. मुंबईत आमच्या 1 लाख पेक्षा अधिक रेडीपटरीवाल्यांना रोजगार मिळाला असल्याची माहिती नरेंद्र मोदींनी दिली. 

मुंबई बाळासाहेबांच्या सिद्धांताचे स्वाभिमानाचे शहर-

मुंबई अनेक भाषांची लोकं येतात. मात्र मविआ भांडणं लावते. काँग्रेस सरकार बनवण्यासाठी उत्सुक आहे.  त्यामुळे ते एससी, एसटी, ओबीसी यांच्यात भांडणं लावत आहेत.  आरक्षण देखील ही लोकं तुमचं घेऊन टाकतील. त्यामुळे एक है तो सेफ है, असं नरेंद्र मोदी म्हणाले. मुंबई बाळासाहेबांच्या सिद्धांताचे स्वाभिमानाचे शहर आहे. मात्र एक पक्ष मविआत आहे, ज्याने काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. काँग्रेसच्या शहजादाकडून बाळासाहेबांचे गौरवउद्गार काढायला सांगा...हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला लावा, असं आव्हान नरेंद्र मोदींनी दिले. सावरकरांना शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे टाकत फिरत आहेत. काँग्रेसचं सरकार असताना देशात दहशतवादी घटना होत होत्या. मात्र आता ते बंद झालंय. आज देशात मोदीचं सरकार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या सभेचा संपूर्ण, Video:

संबंधित बातमी:

Eknath Shinde: तुम्ही उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जीएसटी कपातीनंतर टू-व्हीलर स्वस्त; Royal Enfield, Honda आणि Hero बाईक्सची किंमत कितीने घसरली?
जीएसटी कपातीनंतर टू-व्हीलर स्वस्त; Royal Enfield, Honda आणि Hero बाईक्सची किंमत कितीने घसरली?
Rupali Chakankar : रोहिणी खडसेंच्या पतीच्या अडचणीत वाढ, खेवलकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT गठीत करण्याचे निर्देश
रोहिणी खडसेंच्या पतीच्या अडचणीत वाढ, खेवलकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT गठीत करण्याचे निर्देश
साप चावल्याची आरडाओरडा करत टॅक्सी थांबवली; मुंबईतील व्यवसायिकाची वरळी सी-लिंकवरु उडी
साप चावल्याची आरडाओरडा करत टॅक्सी थांबवली; मुंबईतील व्यवसायिकाची वरळी सी-लिंकवरु उडी
Pakistan Cricket Team: टीम इंडियानं हस्तांदोलन केलं नाही, पाकिस्ताननं रडीचा डाव लावला, पण क्रिकेटमधील नियम आहे तरी काय? शेकहँड करावाच लागतो का??
टीम इंडियानं हस्तांदोलन केलं नाही, पाकिस्ताननं रडीचा डाव लावला, पण क्रिकेटमधील नियम आहे तरी काय? शेकहँड करावाच लागतो का??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जीएसटी कपातीनंतर टू-व्हीलर स्वस्त; Royal Enfield, Honda आणि Hero बाईक्सची किंमत कितीने घसरली?
जीएसटी कपातीनंतर टू-व्हीलर स्वस्त; Royal Enfield, Honda आणि Hero बाईक्सची किंमत कितीने घसरली?
Rupali Chakankar : रोहिणी खडसेंच्या पतीच्या अडचणीत वाढ, खेवलकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT गठीत करण्याचे निर्देश
रोहिणी खडसेंच्या पतीच्या अडचणीत वाढ, खेवलकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT गठीत करण्याचे निर्देश
साप चावल्याची आरडाओरडा करत टॅक्सी थांबवली; मुंबईतील व्यवसायिकाची वरळी सी-लिंकवरु उडी
साप चावल्याची आरडाओरडा करत टॅक्सी थांबवली; मुंबईतील व्यवसायिकाची वरळी सी-लिंकवरु उडी
Pakistan Cricket Team: टीम इंडियानं हस्तांदोलन केलं नाही, पाकिस्ताननं रडीचा डाव लावला, पण क्रिकेटमधील नियम आहे तरी काय? शेकहँड करावाच लागतो का??
टीम इंडियानं हस्तांदोलन केलं नाही, पाकिस्ताननं रडीचा डाव लावला, पण क्रिकेटमधील नियम आहे तरी काय? शेकहँड करावाच लागतो का??
मोठी बातमी! मिनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्याला अटक; आरोपीची कबुली, धक्कादायक खुलासा
मोठी बातमी! मिनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्याला अटक; आरोपीची कबुली, धक्कादायक खुलासा
नागपूर हादरलं! शाळकरी मुलाचे अपहरण अन् हत्या; शेजाऱ्यानेच रचला कट, पोलिसांकडून तिघांना बेड्या
नागपूर हादरलं! शाळकरी मुलाचे अपहरण अन् हत्या; शेजाऱ्यानेच रचला कट, पोलिसांकडून तिघांना बेड्या
आम्हाला बदनाम करू नका; गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणाने चर्चा, मंगला बनसोडेंनी सांगितला तमाशा अन् कला केंद्रातील फरक
आम्हाला बदनाम करू नका; गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणाने चर्चा, मंगला बनसोडेंनी सांगितला तमाशा अन् कला केंद्रातील फरक
85 कोटींचा अपहार, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी; क्राइम ब्रँचकडून राजेंद्र लोढास अटक
85 कोटींचा अपहार, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी; क्राइम ब्रँचकडून राजेंद्र लोढास अटक
Embed widget