एक्स्प्लोर

Risod Assembly Election : काँग्रेसच्या अमित झनक यांची हॅट्रिक, रिसोडमधून शिंदे गटाच्या भावना गवळी पराभूत

Risod Assembly Election : रिसोडमधून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.  

वाशिम : विदर्भातील लक्षवेधी असलेल्या लढतींपैकी एक लढत म्हणजे रिसोड मतदारसंघ. काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या या मतदारसंघात अमित झनक यांनी हॅट्रिक केली. त्यांनी शिंदे गटाच्या भावना गवळी यांचा 6,615 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्यासमोर यंदा शिंदे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार भावना गवळी आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचं आव्हान होतं.

रिसोड मतदारसंघाची पार्श्वभूमी

जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ  हा  काँग्रेसचा  गड मानला जातो. या मतदार संघात नेहमी झनक कुटुंबाचं वजन असल्याचं दिसतंय. मात्र त्यांच्या याच मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस नेते असलेले आणि काँग्रेस सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेले अनंतराव देशमुख हे झनक कुटुंबीयांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जातात. कारण काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठी अनंतराव यांनी मोठे प्रयत्न केले असल्याचं अनेक वेळा उघड झालं असून पक्षाने त्यांचं निलंबनसुद्धा केलं होतं. त्यामुळे झनक देशमुखांचं विळ्या-भोपळ्याचं वैर  समजलं जातंय. 

एकाच पक्षात राहून दोन्ही कुटुंबीयांचं केव्हाच जमलं नाही. त्याची उघड सुरवात झाली ती 2009 च्या निवडणुकीपासून. काँग्रेसचे माजी दिवंगत आमदार सुभाष झनक यांच्या विरोधात बंड पुकारून अनंतराव देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत देशमुख यांचा पराभव झाला. हे वैर  इथंच संपलं नाही तर हे वैर 2019 च्या निवडणुकीत पुन्हा पहायला मिळालं. अमित झनक यांच्या विरोधात अनंतराव देशमुख यांनी अपक्ष निवडणूक  लढवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अमित झनक यांचा अवघ्या 2100 मतांनी निसटता विजय झाला. 

काँग्रेसला कायमचा रामराम करत देशमुख पिता-पुत्रांनी 2022 भाजपमध्ये पिता-पुत्रांनी प्रवेश केला. त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल असं वाटत होतं. मात्र तसं इथेही झालं नाही. महायुतीमध्ये ही रिसोड विधानसभा मतदारसंघाची जागा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे केली आणि ऐनवेळी भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली.

देशमुखांनी कोणतेही संविधानिक पद नसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मोठा निधी मतदारसंघात आणला आणि नियम ढाब्यावर ठेऊन  स्वतः भूमिपूजन केले. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींची नाराजी असल्याचं बोललं जातं होतं. 

सन 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि नव्याने रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आला. रिसोड विधानसभा मतदारसंघात सुभाष झनक हे 51,234 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीनंतर  सुभाष झनक यांना राज्याच्या  मंत्रिमंडळात  स्थान मिळालं. त्यांना महिला व बालकल्याणमंत्री पद मिळालं. .मात्र आदर्श घोटाळा उघड झाला आणि  तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावं लागल. यानंतर  काहीच  महिन्यानंतर सुभाष झनक याचं निधन झालं.

लोकसभा निवडणुकीबरोबर पोटनिवडणूक झाली होती आणि त्यामध्ये अमित झनक यांनी 73,016 मते घेत विजयी झाले. 2014 साली काँग्रेसने  मोदी लाटेत पण अस्तित्व टिकवत आपला गड कायम ठेवला आणि अमित झनक 70,939  मतं मिळवत विजयी झाले. 

तिरंगी लढत

सन 2019 साली रिसोड विधानसभा मतदारसंघात  काँग्रेसने  मोदी लाटेतदेखील अस्तित्व टिकवत आपला गड कायम ठेवला.  इथं अमित झनक 69875 मतं  मिळवत विजयी झाले. मात्र 2019 च्या तुलनेत आता मोठे बदल झाले. भावना गवळी या प्रथमच त्यांची जन्मभूमी असलेल्या रिसोड  मतदारसंघात विधानसभा लढवत आहेत. तर भाजपचे बंडखोर अनंतराव देशमुख वयाच्या 76 व्या वर्षी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसची पकड आणि जातीय फॅक्टरमुळे अमित झनक याना पसंती दिसते. त्यामुळे काट्याची लढत असलेल्या या मतदारसंघात मतदारांनी यावेळीही अमित झनक यांनाच कौल दिला.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Embed widget