एक्स्प्लोर

महायुतीच चांगली होती, असं बोलण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आलीय, शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वालांचा घणाघात 

Ramtek Assembly Constituency : महायुतीच चांगली होती, असं बोलण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आलीय, अशी घणाघाती टीका रामटेक मधील महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 नागपूर : महायुतीच चांगली होती, असं बोलण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आलीय. भाजप (BJP) सोबतची महायुती तोडून आपण काय साध्य केलं, हे मी काय करून चुकलो, असं डोक्यावर हात मारून विचार करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघात (Ramtek Assembly Constituency) काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचच्या पार्श्वभूमीवर रामटेक मधील महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करत जोरदार टोला लगावला आहे.

काँग्रेस उद्धव ठाकरेंना एक एक जागेसाठी रडवत आहे

उद्धव ठाकरे यांना पूर्व विदर्भात 32 जागांपैकी एक जागा ती रामटेकची दिली आणि त्यावरही आता काँग्रेसची नजर आहे. म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरेंना एकही जागा देणार नाही का? काँग्रेस उद्धवजींचा फायदा तर घेत आहे, आता काँग्रेसचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांसाठी किती काम करतील हेही पाहायचं आहे. काँग्रेस उद्धव ठाकरे यांना हैराण आणि परेशान करण्यासाठी डाव रचत आहे. काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना एक एक जागेसाठी रडवत आहे. 

एक काळ होता जेव्हा फक्त चार जागांसाठी भाजप सोबत युती तुटली होती. आज तेच उद्धव ठाकरे 85 जागांवर समाधानी आहे आणि एक एक जागेसाठी त्यांना रडवले जात आहे. अशा स्थितीत महायुती चांगली होती, अशा बोलण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली असल्याची टीका आशिष जयस्वाल यांनी केली आहे. त्यामुळे भाजप सोबतची महायुती तोडून काय साध्य केलं आपण, हा आज खरा प्रश्न आहे आणि हा नक्कीच उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात येत असावा. असेही ते म्हणाले. 

उद्धव ठाकरेंचे जे हाल होत आहे ते मला बघवत नाही

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सत्तेमध्ये घेऊन पुन्हा जिवंत केले. तीच काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारासोबत किती प्रमाणात राहतात, हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल. त्यामुळे हे मी काय करून चुकलो आहे, हे डोक्यावर हात मारून विचार करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर येईल. यांचे जे हाल होत आहे ते मला बघवत नाही. असेही आशिष जयस्वाल म्हणाले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
Satara District bank Chairman Election 2026 Shambhuraj Desai: काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच
Latur DCC Bank Election Result 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा वियजी उमेदवारांची यादी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा वियजी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget