एक्स्प्लोर

Rajya Sabha Election Highlights : चुरस, आक्षेप, उत्कंठा अन् सेलिब्रेशन... राज्यसभा निवडणुकीचे टॉप 10 हायलाईट्स

Rajya Sabha Election Key Points : हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती आला.राज्यसभा निवडणुकीचे टॉप 10 हायलाईट्स जाणून घ्या...

Rajya Sabha Election Key Points : हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती आला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3  उमेदवारांचा विजय झाला शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला. राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली तयारी, त्यानंतर आकड्यांची गणितं, मग मतदान आणि त्या दरम्यान घेतलेले आक्षेप, आरोप-प्रत्यारोप आणि शेवटी लागलेला निकाल. हा सर्व घटनाक्रम अत्यंत उत्कंठावर्धक होता. कालपासून आज पहाटेच्या निकालापर्यंतचे महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात...

1. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात होते. यातील सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यात चुरस होती.

2. यासाठी काल  सकाळी 9 वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली. काल  दुपारी 12 वाजता भाजपकडून जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदेंच्या मतदानावर आक्षेप घेतला.

3. काल दुपारी 1 वाजता निवडणूक आयोगाने भाजपचे आक्षेप फेटाळले. दुपारी 3 वाजता काँग्रेसने भाजपचे सुधीर मुनगंटीवारांच्या मतदानावर आक्षेप घेतला. दुपारी 3.30 वाजता राज्यातील निवडणूक  आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सर्व आक्षेप फेटाळले

4.  भाजपकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेपाबाबत पत्र दिलं तर शिवसेनेकडून आक्षेपाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं.

5. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांची ऑनलाईन बैठक झाली. रात्री 10.15 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली
 
6. दरम्यान मविआ, भाजपनंतर काँग्रेसनं निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र दिलं. मध्यरात्री 12.15 वाजता संजय राऊत निवडणूक अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेले.

7.  मध्यरात्री 1 वाजता सुहास कांदेंचं मत बाद ठरवलं.  रात्री 1.15 वाजता विधानभवनाबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढला

8. रात्री 1.50 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली अन् 3 वाजून 7 मिनिटांनी संजय राऊत, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, अनिल बोंडे, पियूष गोयल विजयी घोषित करण्यात आले.

9. 3.45 वाजता भाजपच्या धनंजय महाडिक यांना विजयी घोषित करण्यात आलं. 

10. धनंजय महाडिक यांनी 41.56 मते घेत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. पियूष गोयल, डॉ अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48 तर इम्रान प्रतापगढी यांना संजय राऊत यांना 41, प्रफुल्ल पटेल यांना 43 मतं मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांची बाजी, महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी.. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय

Dhananjay Mahadik : बाबांना विजयी गुलाल लागताच लेकाचे डोळे पाणावले ! विधानसभेच्या पायऱ्यांवर महाडिक बाप लेकाची गळाभेट

Rajya Sabha Election : सहाव्या जागेवर धनं'जय'..., भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत

महत्त्वाच्या बातम्या

Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget